हैदराबाद : गिर्यारोहक बॉबी मॅथ्यूज आणि त्याचा मित्र जोश मॅडिगन यांनी 1 ऑगस्ट 2015 रोजी व्हाईट फेस माउंटन, एडिरॉंडॅक पर्वतातील शेवटचे शिखर चढले होते. त्यामुळे राष्ट्रीय गिर्यारोहण दिनाचा इतिहास जाणून घ्या.
राष्ट्रीय गिर्यारोहण दिनाचे महत्त्व :गिर्यारोहण एक साहसी खेळाचा प्रकार आहे. त्याचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत. निरोगी जीवनशैली राहण्यासाठी व मनोरंजनासाठी गिर्यारोहण हा अनेकांचा छंद असतो. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्याची काळजी घ्यावी लागते. हा एक जटिल व्यायाम आहे. शरीराच्या सर्व स्नायूंना व्यायाम मिळतो. अशा प्रकारे शरीराचे आकार चांगला राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. गिर्यारोहणाचे विविध फायदे साजरे करण्यासाठी, राष्ट्रीय पर्वतारोहण दिन 2023 मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
गिर्यारोहणाचे आरोग्य फायदे : पर्वत हे प्रवाशांमध्ये एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्यांना मोठे भौगोलिक महत्त्व देखील आहे. याव्यतिरिक्त, पर्वत चढणे अनेक शारीरिक आणि मानसिक आरोग्य फायदे देते. या राष्ट्रीय गिर्यारोहण दिनी तुम्हाला पर्वत चढण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी, गिर्यारोहणाचे काही महत्त्वाचे आरोग्य फायदे खाली दिले आहेत:
- माउंटन क्लाइंबिंगमुळे संपूर्ण शरीराला कसरत मिळते. शरीरातील प्रत्येक स्नायूला व्यायाम मिळतो.
- पर्वत चढल्याने चरबी कमी होते. हृदयाचे आरोग्यही सुधारते.
- निसर्गाच्या सान्निध्य आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते.
- केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर गिर्यारोहणामुळे मानसिक आरोग्यही सुधारते.
- चढ चढल्याने शरीराचा स्टॅमिना सुधारतो.
जगातील 10 उंच पर्वत :
- माउंट अकोनकागुआ, अर्जेंटिना
- माउंट किलिमांजारो, टांझानिया
- एव्हरेस्ट बेस कॅम्प, नेपाळ
- डेनाली, अलास्का
- माउंट एल्ब्रस, रशिया
- माँट ब्लँक, फ्रान्स
- माउंट तोबकल, मोरोक्को
- पिको टर्कीनो, क्युबा
- माउंट किनाबालु, बोर्नियो
- कॅम्बे ज्वालामुखी, इक्वाडोर
हेही वाचा :
- World Nature Conservation Day 2023 : जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2023; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस आणि त्याचे महत्त्व...
- World ORS Day 2023 : जागतिक ओआरएस दिवस 2023; ओआरएस सोल्युशन लहान मुलांसाठी वरदान
- International Friendship Day 2023: आंतरराष्ट्रीय मैत्री दिन आज होतोय साजरा, जाणून घ्या इतिहास