कासारगोड - राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे काम करणाऱ्या उरलुंगल कामगार कंत्राटी सहकारी संस्थेने ( Uralungal Labour Contract Cooperative Society ) अजगराची अंडी वाचवण्यासाठी 54 दिवस काम बंद केले. 54 दिवसांच्या दैनंदिन देखरेखीनंतर आणि काळजी घेतल्यानंतर, सर्व 24 अजगराच्या अंड्यातून पिल्ले ( clutch of python eggs ) बाहेर आले.
यूएलसीसीचे ( ULCC ) कामगार महामार्गाचे काम करत असताना त्यांना अजगर आणि त्याची अंडी मातीच्या बिळात ( eggs in an earthen hole ) दिसली. त्यामुळे त्यांनी अंड्यांच्या संरक्षणासाठी परिसरातील काम बंद केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिळांची सविस्तर तपासणी केली. तेव्हा त्यात साप अंडी उबविल्याचे आढळून आले. तेथून काढून टाकल्यास अंडी खराब होऊ शकत होती. त्यामुळे यूएलसीसीने परिसरातील कामे थांबविण्याचा निर्णय ( stopped work to protect eggs ) घेतला.
कायदेशीर कारवाईचा दिला होता इशारा-कासारगोडचे डीएफओ दानेश कुमार यांनीही अंडी खराब झाल्यास कंपनीला कोणत्या कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते याची माहिती दिली होती. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची 1 मध्ये अजगरांचा समावेश करण्यात आला आहे. अजगराच्या जीवाला कोणताही धोका असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.