नवी दिल्ली :काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ( National Herald case ) सलग तिसऱ्या दिवशी चौकशी ईडीकडून करण्यात येत ( Rahul Gandhi ED Enquiry ) आहे. याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, ईडीच्या दिल्लीतील कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने करण्यात ( Congress workers protest ) आली. काँग्रेस मुख्यालयाबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ईडीच्या कार्यालयाबाहेर जाळपोळ :दिल्लीत ईडीच्या कार्यालयात राहुल गांधींची चौकशी सुरु असताना ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ करत हिंसक आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या संबंधात अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासापूर्वी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ईडीने राहुल गांधींना सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा तपासात सहभागी होण्यास सांगितले. परिसरात अनेक बॅरिकेड्स लावण्यात आले होते.