नवी दिल्ली -नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी (दि. 15 जुन) सलग तिसऱ्या दिवशी ED'कडून चौकशी झाली आहे. सकाळी 11 वाजता ते चौकशीसाठी 'ED' कार्यालयात हजर झाले होते. दरम्यान, आज राहुल गांधी बुधवारी 9.30 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ( Congress Letter To Lok Sabha Speaker ) गेल्या तीन दिवसांत ईडीने सुमारे 27 तास राहुल यांची चौकशी केली आहे. आणखीही चौकशी होणार असून, राहुल गांधी यांना शुक्रवारी (दि. 17 जुन) रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून ईडीने राहुल गांधी यांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अधीर रंजन चोधरी यांनी पत्रात लिहिले आहे की, आमचे सहकारी राहुल गांधी यांची ईडीकडून सलग तीन दिवस चौकशी सुरू आहे. ( Congress Letter To Lok Sabha Speaker Against ED Action ) दररोज सुमारे 10 ते 11 तास चौकशी केली जात आहे. एका देशातील मोठ्या नेत्याला तसेच एका खासदाराला अशी वागणूक मिळणे अमानवी आहे. हे सगळे पाहता यामध्ये काही कट-कारस्थान असण्याची शक्यता आहे असे आम्हाला वाटते. तरी आपण यामध्ये हस्तक्षेप करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची ईडीकडून होत असलेल्या चौकशीबद्दल निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी कोरोनाची लागण झाल्याने हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनीया गांधी यांना फोन करून प्रकृतीची विचारपुस केली आहे. ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee ) ममता सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांच्याकडे अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या चौकशीवरून पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनेदरम्यान काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलीस गुंडगिरी करत आहेत. ( Congress leader Rahul Gandhi in National Herald case ) त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केली. हा गुन्हेगारी अतिक्रमण आहे. त्याची गुंडगिरी शिगेला पोहोचली आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही अहिंसावादी आहोत पण या गोष्टींचा हिशोब होणार असही ते म्हणाले आहेत.