महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NCW on Sand Mafia Attack: महिला अधिकाऱ्याला वाळूतस्करांनी केली मारहाण, महिला आयोगाने घेतली दखल, अहवाल मागवला - DGP RS Bhatti

बिहारमधील बिहता येथे महिला अधिकाऱ्याला रस्त्याच्या मधोमध ओढून मारहाण करण्यात आल्याची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने बिहारचे डीजीपी आरएस भाटी यांना पत्र लिहून एका आठवड्यात संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.

National Commission for Women took cognizance on sand mafia attacked woman officer in bihta
महिला अधिकाऱ्याला वाळूतस्करांनी केली मारहाण, महिला आयोगाने घेतली दखल, अहवाल मागवला

By

Published : Apr 18, 2023, 5:04 PM IST

पाटणा (बिहार): बिहारच्या पाटण्याला लागून असलेल्या बिहटामध्ये खाण माफियांनी सोमवारी खाण खात्याच्या पथकावर हल्ला केला. यादरम्यान अनेक अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर महिला अधिकाऱ्याला जमिनीवर ओढून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मारहाणीच्या या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले. वाळू माफियांवर कारवाई करत प्रशासनाने आतापर्यंत एकूण 45 आरोपींना अटक केली आहे. त्याचबरोबर महिला अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत राष्ट्रीय महिला आयोगानेही कठोर भूमिका घेतली आहे.

NCW ने घेतली दखल : राष्ट्रीय महिला आयोगाने बिहटा येथील महिला अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मुख्य सचिव, DGP, DM, SSP यांना नोटीस पाठवली आहे. त्याचे उत्तर आठवडाभरात मागवण्यात आले आहे. आयोगाने बिहारचे डीजीपी आरएस भाटी यांना पत्र लिहून वैयक्तिकरित्या या प्रकरणाकडे लक्ष द्यावे आणि निष्पक्ष आणि कालबद्ध तपास सुनिश्चित करावा, अशी सूचनाही महिला आयोगाने दिली आहे.

महिला अधिकाऱ्याला मारहाणीचे प्रकरणःपटनाच्या बिहता पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी मोठा गोंधळ झाला. पारेव सोन बाळू घाटावर ओव्हरलोडिंगवर प्रशासनाची कारवाई सुरू होती. खनिकर्म विभागाचे पथक आणि पोलिस येथे पोहोचले होते. मात्र पथकाला पाहताच वाळू माफियांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक खाण अधिकारी आणि कामगार जखमी झाले. त्याचवेळी एका महिला अधिकाऱ्याला माफियांनी बेदम मारहाण केली. धावत असताना महिलेला रस्त्याच्या मधोमध ओढून नेण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी जीव वाचवून पळ काढला. महिलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एनसीडब्ल्यूने त्याची दखल घेतली आहे.

सीएम नितीश यांच्यावर भाजपचा निशाणा :बिहटा प्रकरणाबाबत भाजप नेते निखिल आनंद म्हणाले की, नितीश कुमार खाण माफियांवर लगाम घालण्यात अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे, जेडीयूचे प्रवक्ते अभिषेक झा म्हणाले की, बिहारमध्ये आमचे सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी गुन्ह्याबाबत कोणाशीही तडजोड केलेली नाही. तर राजदचे प्रवक्ते एजाज अहमद म्हणाले की, बिहटा प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.

हेही वाचा: चार वर्षीय मुलीवर अत्याचार, २० वर्षांची शिक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details