महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Hindenburg Report : अदानी समूहाच्या वेगवान व्यवसायाला धक्का देणार्‍या 'अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर'ची कहाणी

अदानीच्या साम्राज्याला हादरवून सोडणाऱ्या हिंडनबर्गच्या अहवालामागील माणूस दुसरा कोणी नसून जेरुसलेममधील रुग्णवाहिका चालक आहे. ज्यानेनंतर जाऊन हिंडेनबर्ग कंपनीची स्थापना केली. आत्तापर्यंत त्याने डझनभर कंपन्याचे घोटाळे उघड केले आहेत. जाणून घ्या.

By

Published : Feb 2, 2023, 1:30 PM IST

Hindenburg Report
अदानी समूहाच्या वेगवान व्यवसायाला धक्का देणार्‍या 'अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर'ची कहाणी

नवी दिल्ली : 24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग संशोधन समोर आल्यानंतर, गुगलवर सर्वात जास्त शोधले गेलेले नाव नॅथन अँडरसनचे आहे. या एकाच नावामुळे गौतम अदानी यांच्याकडून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब हिसकावून घेण्यात आला. अवघ्या 72 तासांत अदानींना 1.5 लाख कोटी गमवावे लागले. शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली. अशा परिस्थितीत हा नॅथन अँडरसन कोण आहे, असा प्रश्न पडतो. जाणून घेऊयात त्याबद्दल माहिती.

नॅथन अँडरसन आणि अदानी : नॅथन अँडरसन, ज्याने अवघ्या दोन दिवसांत मार्केटमधून 51 बिलियन डॉलरची उलाढाल केली. तो प्रत्यक्षात रुग्णवाहिका चालक होता. तो जेरुसलेममधील हॉस्पिटलसाठी अ‍ॅम्ब्युलन्स चालवत असे. त्यानंतर तो अमेरिकेकडे गेला. 2017 मध्ये अमेरिकेच्या प्रसिद्ध कनेक्टिकट विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर अँडरसनने यापूर्वी फॅक्ट सेट या आर्थिक डेटा कंपनीमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून काम केले होते. त्यानंतर वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्कमधील स्टॉक मार्केटमधील ब्रोकर डीलर फर्ममध्ये काम केले.

हिंडेनबर्गची स्थापना : 38 वर्षीय अँडरसनने हिंडेनबर्गची स्थापना करण्यापूर्वी हॅरी मार्कोपोलॉससोबत काम केले. मार्कोपोलोस ही अशी व्यक्ती आहे ज्याने बर्नी मॅडॉपची पॉन्झी योजना उघड करून जगभरात दहशत निर्माण केली होती. आणि मार्कोपोलोससह, अँडरसनने प्लॅटिनम पार्टनर विषयी माहिती हस्तगत गेली, ज्याने अब्ज डॉलर्सची फसवणूक केली होती. त्यानंतर अँडरसनने हिंडेनबर्ग रिसर्च नावाची कंपनी स्थापन केली. या मागेह एक कथा आहे. वास्तविक, अँडरसनने हिंडेनबर्गचे नाव 1937 मध्ये ठेवले. हिंडनबर्ग नावाची जर्मन एअरशिपचा न्यू जर्सीमध्ये अपघाताला झाला. त्यात 35 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचा संदर्भ देत अपघातातून अँडरसनने कंपनीचे हिंडेनबर्ग नाव ठेवले.

हिंडनबर्ग अहवाल : हिंडनबर्ग अहवाल प्रथम सप्टेंबर 2020 मध्ये प्रकाश झोतात आला. जेव्हा इलेक्ट्रिक ट्रक बनवणाऱ्या निकोला कॉर्प याला लबाड आणि फसवा म्हणत उद्योग जगतात गोंधळ निर्माण केला होता. त्यानंतर निकोला कॉर्पने सर्व आरोप फेटाळले. हिंडेनबर्गचे आरोप हे खोटे असल्याचे त्यांनी म्हटले. नंतर, जेव्हा हिंडनबर्गने हे पुराव्यासह सिद्ध केले, तेव्हा कंपनीने ते स्वीकारले. 2021 मध्ये, अमेरिकन सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनला 125 लाख डॉलर्स देऊन कंपनीने आरोपांतून सुटका करून घेतली.

60 डॉलरचा शेअर तीन डॉलरवर :याचा परिणाम असा झाला की कंपनीचा 60 डॉलरचा शेअर तीन डॉलरवर पोहोचला, त्यामुळे शेअर बाजाराला करोडो अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. खरे तर, त्याच्या खोट्या दाव्यांमुळे, जेव्हा कंपनी जून 2020 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली. तेव्हा तिने तिच्या स्टॉकचे मूल्य 34 अब्ज डॉलर्स असा अंदाज लावला होता, तर प्रत्यक्षात त्याचे एकूण मूल्य 1.34 अब्ज डॉलर्स होते. हिंडेनबर्ग रिसर्चने यूएसमधील डझनभर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे, ज्यात WINS फायनान्सचाही समावेश आहे. या कंपनीने चिनी कंपनीच्या माध्यमातून बाजारात पैसे गुंतवल्याचा खुलासा हिंडनबर्गने केला होता.

हेही वाचा :Adani Enterprises calls off FPO : शेअर्स घसरल्यानंतर अदानी एंटरप्रायजेसकडून 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द, गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार

ABOUT THE AUTHOR

...view details