महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NASA: नासाने शेअर केले अंतराळातील खांबांचे फोटो... - NASA james webb telescope

नासाने (NASA) जाहीर केले आहे की, जेम्स वेब दुर्बिणीने छायाचित्रित केलेल्या अंतराळ स्तंभातील पिलर्स ऑफ क्रिएशनचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट छायाचित्र घेतले आहे. नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीने (NASA james webb telescope) अवकाशातील स्तंभाचे (Space Piller Photo) छायाचित्रण केले.

NASA released the clearest pictures of the pillars of space
नासाने शेअर केले अंतराळातील खांबांचे फोटो

By

Published : Oct 22, 2022, 11:21 AM IST

Updated : Oct 22, 2022, 1:00 PM IST

न्यूयॉर्क: नासाच्या (NASA) जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आणखी एक पराक्रम गाजवल्याचे जाहीर केले आहे. त्याने आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट छायाचित्र कॅप्चर केले आहे. एक हिरवेगार, अत्यंत तपशीलवार लँडस्केप कॅप्चर केले आहे. सृष्टीचे प्रतीकात्मक स्तंभ (Pillars of Creation), जेथे वायू आणि धूळीने ढगांच्या आत नवीन तारे तयार होत आहेत. नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीने (NASA james webb telescope) अवकाशातील स्तंभाचे छायाचित्रण केले.

असे तयार होतात तारे :स्पेस एजन्सीच्या म्हणण्यानुसार, त्रिमितीय (3D piller) खांब दगडी रचनेसारखे दिसतात. हे खांब थंड आंतरतारकीय वायू आणि धुळीने बनलेले आहेत. ही तारा तयार होण्याची प्रक्रिया आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा खांबांच्या आत पुरेशा वस्तुमानासह धूळ आणि वायूचे ढिगारे तयार होतात, तेव्हा ते स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाखाली कोसळू लागतात. यामुळे, गॅस हळूहळू गरम होतो आणि नवीन तारे तयार होतात.

नासाने अवकाशातील खांबांची स्पष्ट छायाचित्रे प्रसिद्ध केली :NASA ने एका निवेदनात म्हटले आहे की, वेबच्या पिलर्स ऑफ क्रिएशनसाठी नवीन दृष्टीकोन संशोधकांना या प्रदेशातील वायू आणि धूळ यांचे प्रमाण ओळखून त्यांचे मॉडेल सुधारण्यास मदत करेल. तसेच नव्याने तयार झालेल्या ताऱ्यांची अधिक अचूक गणना करण्यात मदत करेल. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपला जगातील आघाडीची अवकाश विज्ञान वेधशाळा म्हटले जाते. नासाने सांगितले की, ते आपल्या सूर्यमालेतील रहस्ये सोडवेल. इतर तार्‍यांच्या सभोवतालच्या दूरच्या जगाकडे पाहतील. आपल्या विश्वाची रहस्यमय रचना, उत्पत्ती आणि त्यामधील आपले स्थान तपासेल. अलीकडे, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने नेपच्यूनच्या कड्यांचे 30 वर्षांहून अधिक काळातील सर्वात स्पष्ट दृश्य देखील टिपले आहे.

Last Updated : Oct 22, 2022, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details