नवी दिल्लीnarendra modi to burn Effigy ravana पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (24 ऑक्टोबर) द्वारका सबसिटीच्या सेक्टर 10 येथील रामलीला मैदानावर रावणाच्या प्रतिकात्मक दहनासाठी येणार आहेत. रामलीला समितीचे निमंत्रक राजेश गेहलोत यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. यापूर्वी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केले होते. दरम्यान, आज संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान पंतप्रधान मोदी द्वारकेत येणार असल्याचं सांगण्यात येतंय.
मागील काही दिवसांपासून द्वारका सेक्टर 10 मध्ये आयोजित 11 व्या भव्य रामलीलामध्ये पंतप्रधान येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. परंतु शेवटपर्यंत त्याची पुष्टी करण्यात आली नव्हती. अखेर सोमवारी (23 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा ही माहिती देण्यात आली. दरम्यान, रामलीलाची सुरूवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या दिल्ली राज्यानं येथे शौर्य जागरण यात्रा काढली होती. त्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसंच रामलीला मैदानावर 10,000 लोकं बसण्याची क्षमता असून रामलीला पाहण्यासाठी दूरदूरहून लोकं येथे येतात.