नवी दिल्ली Narendra Modi on Victory :पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी भारत माता की जय अशा घोषणेनं त्यांच्या भाषणाची सुरूवात केली. त्याचवेळी ही घोषणा तेलंगाणापर्यंत पोहोचली पाहिजे असा गर्भित इशाराही मोदींनी विजयी भाषणात दिला. सबका साथ सबका विकास या भूमिकेचा विजय झाला आहे असं मोदी म्हणाले. भारताच्या विकासाकरता राज्यांचा विकास झाला पाहिजे या विचाराचा विजय झाला आहे असं मोदी म्हणाले. ते नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या लोकांनी भाजपाला मोठी साथ दिली आहे. तेलंगाणामध्येही भाजपाचं समर्थन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढल्याची जाणीव होते. सर्वच माता भगिनींसह युवा मतदारांनी जो निर्णय घेतला त्यापुढे नतमस्तक होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
जातीमध्ये वाटण्याचा प्रयत्न -या निवडणुकीत देशाला जाती-जातीमध्ये वाटण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपण देशात फक्त चार जाती असल्याचं मानतो असं म्हटलं होतं. त्याच जाती सर्वात मोठ्या असल्याचं मी म्हटलं होतं याची आठवण मोदींनी करुन दिली. नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी तसंच गरीब याच जाती मी मानतो असं मोदींनी सांगितलं होतं. तेच ही निवडणूक जिंकले आहेत, असं मला वाटतं. याच चार जातीतून मोठ्या प्रमाणात वंचित, आदिवासी, शेतकरी येतात. आजचा विजय हा त्यांना त्यांचा विजय असल्याचं दिसत आहे. युवकांना ही त्यांची सफलता वाटत आहे, असं मोदी म्हणाले.
मोदींची हमी म्हणजे पूर्ण होण्याची हमी -आज विशेषतः महिलांचं अभिनंदन करत असल्याचं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तसंच नारीशक्ती जर कुणाचं सुरक्षा कवच झाल्या. त्याचं कुणीच नुकसान करु शकत नाही. तेच या निकालातून पाहायला मिळत असल्याचं मोदी म्हणाले. आज प्रत्येक महिलेला वाटतं की आज बीजेपीचं नारी सन्मान आणि सुरक्षेची सर्वात मोठी हमी आहे. या महिलांनी पाहिलं आहे की गेल्या दहा वर्षात टॉयलेट, वीज, पाणी, बँकेत खातं यासाठी भाजपंनं कसं इमानदारीनं काम केलं आहे. त्यांची आर्थिक भागिदारी वाढवण्यासाठी भाजपा कसं निरंतर काम करत आहे. हे महिला पाहात आहेत. त्यांचं योगदान या निवडणुकीत मोठं आहे. भाजपाच्या विजयाची एकप्रकारे त्यांनी जबाबदारी घेतली होती असं वाटत होतं. त्यांना भाजपानं जी आश्वासनं दिली आहेत. ती शंभर टक्के पूर्ण केली जातील. ही मोदींची हमी आहे. आणि मोदींची हमी म्हणजे हमी पूर्ण होण्याची हमी हे सर्वजचण जाणतात, अशी कोटी यावेळी मोदींनी केली.
विजय हा मोदींच्या यशाचा संदेश -पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवल्याची प्रतिक्रिया यावेळी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिली आहे. मोदींनी प्रत्येक चॅलेंज पूर्ण केल्याचंही ते म्हणाले. प्रतिकूल परिस्थितीत मोदींनी देशाचं नेतृत्व केलं. वंचित, पीडित तसंच शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं नड्डा म्हणाले. यावेळी झालेला निवडणुकीतील विजय हा मोदींच्या यशाचा संदेश असल्याचंही ते म्हणाले. या निवडणुकीत विरोधकांच्याकडून असंसदिय भाषेचा वापर करण्यात आला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही अशा भाषेत नड्डा यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांना टोला लगावला. कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यामुळेच हा विजय मिळू शकला. त्यामुळेच या सर्वच कार्यकर्त्यांंचं अभिनंदन करतो. तसंच त्यांचे आभार मानतो असं नड्डा म्हणाले. मोदींच्या नेतृत्वातील सबका साथ सबका विकास यालाच या विजयानं बळ दिल्यांच नड्डा यावेळी म्हणाले.
हेही वाचा...
- तेलंगणात झळकले महाराष्ट्राचे माणिक'राव'; काँग्रेस विजयात 'ठाकरें'चं योगदान
- ABVP सदस्य ते तेलंगणात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार! असा आहे रेवंत रेड्डी यांचा प्रवास
- मोठी बातमी! रेवंत रेड्डींना भेटणं तेलंगाणा पोलीस महासंचालकांना पडलं महागात; EC कडून निलंबनाची कारवाई