महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Modi Killed Jayalalitha : 'मोदींनी जयललिता यांची हत्या केली', द्रमुकच्या आमदाराचा खळबळजनक दावा

तामिळनाडूच्या विलाथिकुलम येथे सभेत बोलताना विलाथिकुलम द्रमुकचे आमदार मार्कंडेयन (DMK MLA Markandeyan) म्हणाले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, 'माजी मुख्यमंत्री जयललिता यांना मोदींनी मारले आहे. भाजपने त्यांची हत्या केली, कारण त्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून उभ्या राहणार होत्या'. (Narendra Modi killed Former CM Jayalalitha).

By

Published : Jan 8, 2023, 3:22 PM IST

Modi Killed Jayalalitha
मोदींनी जयललिता यांची हत्या केली

थुथुकुडी (तामिळनाडू) : तामिळनाडूच्या विलाथिकुलम येथे द्रमुकच्या वतीने प्राध्यापक अनबझगन शताब्दी महोत्सवानिमित्त विशाल पथ प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी विलाथिकुलम चे द्रमुकचे आमदार मार्कंडेयन, (DMK MLA Markandeyan) द्रमुकचे अधिकारी, स्वयंसेवक आणि अनेक गावकरी यात सहभागी झाले होते.

जयललिता पंतप्रधानपदासाठी उभ्या राहणार होत्या : या सभेत बोलताना विलाथिकुलम द्रमुकचे आमदार मार्कंडेयन म्हणाले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, 'माजी मुख्यमंत्री जयललिता जिवंत असेपर्यंत मी अण्णाद्रमूक मध्ये होतो. त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांना मोदींनी मारले आहे. भाजपने त्यांची हत्या केली, कारण त्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून उभ्या राहणार होत्या. आणि मी हे उघडपणे आरोप करतो आहे'. (Narendra Modi killed Former CM Jayalalitha). त्याचे हे भाषण इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. त्यांच्या या आरोपाचा भाजप नेते आणि सदस्य तीव्र निषेध करत आहेत.

अरुमुगासामी चौकशी समितीचा अहवाल : जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी अरुमुगासामी चौकशी समितीचा अहवाल 18 ऑक्टोबर 2022 रोजी तामिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला होता. जयललिता यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा 5 डिसेंबर रोजी करण्यात आली, तर अरुमुगासामी आयोगाने पुराव्याच्या आधारे 4 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

जयललिला यांच्या मृत्यूबाबक संशय :5 डिसेंबर 2016 रोजी चेन्नई येथील रुग्णालयात जयललिता यांच्या निधनानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश ए अरुमुगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी चौकशी आयोग स्थापन करण्यात आला. यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनीही जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी अनेकदा केली होती. जयललिता यांना मृत्यूपूर्वी कोणालाही भेटू दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्यासोबत त्यांची सहकारी शशिकला हॉस्पिटलमध्ये होती. याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

उपचारावरही प्रश्नचिन्ह : चौकशी आयोगाने जयललिता यांच्या उपचारावरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉक्टर सुमीन शर्मा यांच्या शिफारशीनंतरही जयललिता यांची अँजिओग्राफी का करण्यात आली नाही? डॉक्टर रिचर्ड पील यांनी तिला उपचारासाठी परदेशात नेण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतरही असे का झाले नाही? असे प्रश्न चौकशी समितीने उपस्थित केले आहेत. योग्य उपचार झाले असते तर जयललिता यांचे प्राण वाचू शकले असते, असेही तपास अहवालात म्हटले आहे. सप्टेंबर 2016 मध्ये जयललिता बेशुद्ध झाल्यापासून सर्वकाही संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details