महाराष्ट्र

maharashtra

Narendra Modi : 'ही मोदीची गॅरंटी आहे', तिसऱ्या टर्मचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्लीत पुनर्विकसित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर कॉम्प्लेक्स 'भारत मंडपम' चे उद्घाटन केले. यावेळी बोलताना, 'आपल्या तिसर्‍या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल', असे ते म्हणाले.

By

Published : Jul 26, 2023, 10:45 PM IST

Published : Jul 26, 2023, 10:45 PM IST

Narendra Modi
नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-कम-कन्व्हेन्शन सेंटर (IECC) संकुल राष्ट्राला समर्पित केले. यावेळी अनेक केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी सकाळी ITPO परिसरात हवन आणि पूजेत भाग घेतला. त्यांनी आज सकाळी कॅम्पसमध्ये वैदिक मंत्रोच्चारासह प्रार्थना केली. माहितीनुसार, हे संकुल बनवण्यासाठी सुमारे 2700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कन्व्हेन्शन सेंटरला 'भारत मंडपम' असे नाव देण्यात आले आहे.

'तिसऱ्या कार्यकाळात अधिक वेगाने विकास होईल' : कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, '2024 मध्ये सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अधिक वेगाने विकास होईल. विकासाचा हा प्रवास थांबणार नाही याची मी देशवासियांना ग्वाही देतो, असे ते म्हणाले. ही नरेंद्र मोदीची हमी असल्याचेही ते म्हणाले. मोदी म्हणाले की, 'तिसऱ्या टर्ममध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असू'.

'भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल' : आपल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळातील विकासाची आकडेवारी देताना पंतप्रधान म्हणाले की, 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा भारत 10 वी मोठी अर्थव्यवस्था होती. आता भारत अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर पाचव्या क्रमांकावर आहे. आपल्या तिसर्‍या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असे ते म्हणाले. पुढील सार्वत्रिक निवडणुका मे 2024 मध्ये होणार आहेत.

कॉम्प्लेक्समध्ये अनेक अत्याधुनिक सोईसुविधा आहेत : प्रगती मैदानावर नव्याने विकसित झालेल्या IECC कॉम्प्लेक्समध्ये कन्व्हेन्शन सेंटर, एक्झिबिशन हॉल, अ‍ॅम्फी थिएटर इत्यादींसह अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. प्रगती मैदान संकुलाचा केंद्रबिंदू म्हणून अधिवेशन केंद्र विकसित करण्यात आले आहे. ही एक भव्य वास्तुशिल्प कलाकृती आहे, जी मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, व्यापार मेळावे, परिषद, परिसंवाद आणि इतर प्रतिष्ठित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

सिडनी ऑपेरा हाऊसपेक्षा जास्त आसन क्षमता : संकुलाच्या भव्य हॉल आणि प्लेनरी हॉलची क्षमता 7 हजार लोकांची आहे, जी ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध सिडनी ऑपेरा हाऊसच्या आसन क्षमतेपेक्षा जास्त आहे. त्याच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये 3,000 लोक बसू शकतात. कन्व्हेन्शन सेंटरच्या इमारतीची वास्तू भारतीय परंपरांनी प्रेरित आहे. ही इमारत शंखाच्या आकाराची आहे. कन्व्हेन्शन सेंटरच्या विविध भिंती आणि दर्शनी भागावर भारताच्या पारंपारिक कला आणि संस्कृतीच्या घटकांचे चित्रण आहे. याशिवाय, यावर देशातील विविध प्रांतातील विविध चित्रे आणि आदिवासी कला विविध स्वरूपात चित्रित केल्या आहेत.

हायटेक कनेक्टिव्हीटी : कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 5G-सक्षम Wi-Fi, 10G इंट्रानेट कनेक्टिव्हिटी तसेच 16 वेगवेगळ्या भाषांना सपोर्ट करण्यासाठी अत्याधुनिक भाषांतर कक्ष आहे. याव्यतिरिक्त, IECC कॉम्प्लेक्समध्ये एकूण सात प्रदर्शन हॉल आहेत. प्रदर्शन हॉल विविध प्रकारच्या उद्योगांना सामावून घेण्यासाठी आणि जगभरातील उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. IECC मध्ये तब्बल 5,500 पेक्षा जास्त वाहनांच्या पार्किंगची सुविधा आहे.

हेही वाचा :

  1. No Confidence Motion : '..तर 2023 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणाल', मोदींनी चार वर्षांपूर्वीच केले होते भाकीत!

ABOUT THE AUTHOR

...view details