महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PM Narendra Modi : कॉंग्रेसला गुजरातमध्ये मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, मोदींची जाहीर सभेत टीका - राहुल गांधी

भारत जोडो यात्रेदरम्यान नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासोबत पदयात्रा काढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. (Narendra Modi on medha patkar). गुजरातमधील धोराजी येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, "तीन दशके नर्मदा धरण प्रकल्प रखडलेल्या महिलेसोबत काँग्रेसचा एक नेता पदयात्रा काढताना दिसला." (Medha Patkar joins Bharat Jodo Yatra).

Narendra Modi
Narendra Modi

By

Published : Nov 20, 2022, 7:26 PM IST

Updated : Nov 20, 2022, 8:28 PM IST

धोराजी (गुजरात) - "ज्या महिलेने तीन दशके नर्मदा धरण प्रकल्पाला विरोध केला ती महिला कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शामिल आहे. त्यामुळे कॉंग्रेस आता गुजरातमध्ये कोणत्या नैतिक आधारावर मते मागत आहे", अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. (Narendra Modi on medha patkar). काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या भारत जोडो यात्रेत शनिवारी महाराष्ट्रातील नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सहभागाचा उल्लेख करताना मोदींनी हे वक्तव्य केले. (Narendra Modi criticize Rahul Gandhi).

यांच्यामुळेच प्रकल्प रखडला - गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील धोराजी नगर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लांबला कारण अनेकांनी तो रोखण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, 'कच्छ आणि काठियावाड (सौराष्ट्र प्रदेश) यांना पिण्याचे पाणी देण्यासाठी नर्मदा प्रकल्प हा एकमेव उपाय होता. सरदार सरोवर धरण विरोधी कार्यकर्त्या असलेल्या एका महिलेसोबत काँग्रेसचा नेता कसा पदयात्रा करत होता हे तुम्ही काल पाहिलंच असेल. त्यांनी आणि इतरांनी कायदेशीर अडथळे निर्माण केले आणि तीन दशके प्रकल्प रखडला.

गुजरातला बदनाम केले - पंतप्रधान म्हणाले, 'इथे पाणी पोहोचले नाही म्हणून या कामगारांनी निदर्शने केली.' त्यांनी कार्यकर्त्यांवर गुजरातची एवढी बदनामी केल्याचा आरोप केला की, जागतिक बँकेनेही या प्रकल्पाला निधी देणे बंद केले. ते म्हणाले, 'जेव्हा काँग्रेस तुमच्याकडे मते मागायला येते, तेव्हा त्यांचे नेते नर्मदा प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या एका महिलेसोबत पदयात्रा काढत असतात. विरोधी पक्ष कोणत्या नैतिकतेच्या आधारावर मते मागत आहेत, हे तुम्ही त्यांना विचारावे असे मला वाटते.

भाजपने पाणीटंचाई दूर केली - मोदी म्हणाले की, गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लहान धरणे बांधणे, नवीन विहिरी आणि तलाव खोदणे आणि पाइपलाइनद्वारे पाणी वाहतूक करणे अशा विविध योजनांच्या माध्यमातून पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी 20 वर्षे कठोर परिश्रम केले. ते म्हणाले, 'आज संपूर्ण कच्छ-काठियावाड भागाला पाइपलाइन नेटवर्कद्वारे पाणी मिळत आहे. समस्यांवर कायमस्वरूपी उपाय देण्यावर आमचा विश्वास आहे. विकासासाठी पाणी आणि वीज आवश्यक आहे हे आपण समजतो. काँग्रेस सरकारला केवळ हातपंप उभारण्यातच रस होता. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा एक डिसेंबरला आणि दुसरा टप्पा 5 डिसेंबरला. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. धोराजी परिसरात एक डिसेंबरला मतदान होणार आहे.

Last Updated : Nov 20, 2022, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details