उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोस चेन्नईमध्ये घेतला.
CORONA Vaccination : पंतप्रधान मोदींसह देशभरातील 'या' नेत्यांनी घेतली कोरोना लस - ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक
15:44 March 01
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी घेतली कोरोना लस
14:49 March 01
नेपाळच्या लष्करप्रमुखांनी घेतली कोरोना लस
नेपाळचे लष्करप्रमुख पूर्ण चंद्र थापा यांना मेड इन इंडिया लसीचा पहिला डोस मिळाला.
14:15 March 01
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी कोरोना लसीचा डोस घेतला.
14:15 March 01
ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही कोरोनाची लस टोचवून घेतली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आज ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही कोरोनाची लस टोचवून घेतली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली. आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांनी जरूर घ्यावी", असं आवाहन पटनायक यांनी केले.
14:14 March 01
आज पंतप्रधान मोदींसह या नेत्यांनी घेतला कोरोना लसीचा डोस
नवी दिल्ली -कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 1 मार्चपासून म्हणजेच सोमावारपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींचं लसीकरण करण्यात येणार आहे. याच टप्प्यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार ज्यांचं वय 50 वर्षांहून अधिक आहे अशांना कोरोना लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधील एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यांच्यासह इतर नेत्यांनी आज कोरोना लस टोचवून घेतला आहे.
देशात कोरोना लसीकरण मोहिमेला 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. परंतु, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते या लसीकरण मोहिमेत का सहभागी झाले नाहीत? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. या निमित्तानं कोरोना लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेत्यांनी लस घेतल्याने लसीसंदर्भातील सर्व गैरसमज दूर होतील.