महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मिरात ड्रग्ज तस्करांचे जाळे हे मोठे आव्हान - डीजीपी दिलबाग सिंग

गेल्या वर्षभरात ड्रग्ज आणि ड्रग्ज तस्करांविरोधात मोठे अभियान राबवण्यात आले. याप्रकरणी १ हजार १३२ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत १ हजार ६७२ लोकांना अटक करण्यात आली आहे.

जम्मू काश्मिरात ड्रग्ज तस्करांचे जाळे हे मोठे आव्हान - डीजीपी दिलबाग सिंग
जम्मू काश्मिरात ड्रग्ज तस्करांचे जाळे हे मोठे आव्हान - डीजीपी दिलबाग सिंग

By

Published : Jan 1, 2021, 4:05 PM IST

श्रीनगर -जम्मू आणि काश्मिरात २०२० या वर्षभरात जवळपास १६००हून अधिक ड्रग्ज तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली. जम्मू काश्मिरात दहशतवादानंतर ड्रग्ज तस्कर ही मोठी समस्या आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या वर्षभरात ड्रग्ज आणि ड्रग्ज तस्करांविरोधात मोठे अभियान राबवण्यात आले. याप्रकरणी १ हजार १३२ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत १ हजार ६७२ लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी ३५ ड्रग्ज तस्करांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दहशतवादानंतर जम्मू काश्मिरात ड्रग्ज हे एक मोठे आव्हान आहे. यामुळे तरुण उद्ध्वस्त होत आहेत, असेही सिंग यांनी सांगितले.

ड्रग्ज तस्करांच्या जाळ्यामुळे पोलीस प्रशासनासह नागरी संघटनांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या वर्षभरात १५२ किलो हेरॉईन, ५६३ किलो कॅनबीज आणि २२ हजार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. यासह अनेक ड्रग्जसंबंधीचे साहित्यही जप्त करण्यात आले, असेही सिंग यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details