हैदराबाद : हैदराबादच्या नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR) युनिव्हर्सिटी ऑफ लॉने ट्विटर हँडलवर एक घोषणा केली. हैदराबादच्या जस्टिस सिटी, शमीरपेट येथील त्यांच्या कॅम्पसच्या GH-6 चा तळमजला LGBTQ+ (Gender-Neutral Space) समुदायासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
@NALSAR_Official या ट्विटर हँडलवर शनिवार, 26 मार्च रोजी सकाळी हे ट्विट करण्यात आले होते. यात योग्य वेळी लैंगिक तटस्थ वसतिगृहांसाठी योजना सुरू असल्याचेही सांगितले होते. शैक्षणिक ब्लॉकच्या तळमजल्यावरील वॉशरूमही लिंग तटस्थ शौचालय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नालसारचे कुलसचिव प्रा. व्ही बालकिस्ता रेड्डी यांनी याबद्दल सांगितले.