महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chase away Tipu lovers : टिपू सुलतानवर प्रेम करणाऱ्यांनी पृथ्वीवर राहू नये; नलिन कुमार कटील यांचे वादग्रस्तच वक्तव्य - Nalin Kumar Katil Controversial statement

भारतीय जनता पार्टी कर्नाटकचे प्रमुख नलिन कुमार कटील यांची मंगळवारी सभा पार पडली. यादरम्यान त्यांनी टिपू सुलतानवर प्रेम करणारे लोक पृथ्वीवर राहू शकत नाहीत असे म्हटले. हे राज्य केवळ भगवान राम आणि हनुमानाच्या उपासकांचे आहे असे त्यांनी म्हटले.

Chase away Tipu lovers
टिपू सुलतानवर प्रेम करणाऱ्यांनी पृथ्वीवर राहू नये

By

Published : Feb 16, 2023, 10:14 AM IST

कर्नाटक :भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटकचे अध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोप्पल जिल्ह्यातील यलबुर्गा येथील लोक जे राम आणि हनुमानाचे स्तोत्र गातात त्यांनाच येथे राहण्याचा हक्क आ,हे असे त्यांनी म्हटले आहे. तर जे 18 व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुलतानवर प्रेम करतात आणि त्याला समर्थन देताता त्यांनी पृथ्वीवर राहू नये असे म्हटले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. वास्तविक, नलिन कुमार कटील मंगळवारी एका जाहीर सभेला संबोधित करत होते. तब्बल तीन महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण किती चिघळेल हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

आम्ही टिपू सुलतानची मुले नाही :सभेला संबोधित करताना नलिन कुमार कटील म्हणाले की आम्ही राम आणि अंजन पुत्र हनुमानाचे भक्त आहोत. आम्ही टिपू सुलतानची मुले नाही. यानंतर त्यांनी जमावाला विचारले की, मला यलबुर्गाच्या लोकांना विचारायचे आहे की तुम्ही हनुमानाची पूजा करता की टिपू सुलतानचे भजन गाता? टिपूचे गुणगान गाणाऱ्यांना तुम्ही जंगलात पाठवणार की नाही? भाजप नेते नलिन कटील यांनी कोप्पल जिल्ह्यात हे विधान केले आहे. ज्याला पौराणिक मान्यतांनुसार रामायणात वर्णन केलेले माकड साम्राज्य 'किष्किंधा प्रदेश' मानले जाते. हे ठिकाण हनुमानाचे जन्मस्थान असल्याचेही काहींचे म्हणणे जाते.

हिंदुत्वाचे विचारवंत : मंगळुरु कुकर बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद शरीक याच्याशी सहानुभूती दाखवत असल्याचा आरोप कटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यावर केला. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी ऑटोरिक्षात कथित कुकर बॉम्बस्फोटात शारिक जखमी झाला होता. कटील यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा 18 व्या शतकातील म्हैसूरचा राजा टीपूसुलतानचा संदर्भ दिला आहे. यापूर्वी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांना हिंदुत्वाचे विचारवंत विनायक सावरकर आणि टिपू सुलतान यांच्या विचारसरणीतील लढाई असल्याचे म्हटले होते.

लखनऊमध्ये हिंदूत्वाचा नारा : भारत हे हिंदूराष्ट्र होते, आहे आणि यापुढेही भारत हिंदूराष्ट्रच राहील असा एल्गार उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये दिला. योगी आदित्यनाथ यांनी एका खासगी कार्यक्रमात लखनऊ हजेरी लावली. योगी आदित्यनाथ यांनी भारत हे हिंदूराष्ट्र असल्याबाबत ठणकाऊन सांगितले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी हजला गेलेल्यांनाही तेथे हाजी संबोधले जात नाही असा उल्लेख केला. त्यांना हिंदूच संबोधले जाते, त्यामुळे भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा :CM Yogi Adityanath On Hindu Rashtra : भारत हिंदूराष्ट्र होते, आहे आणि हिंदू राष्ट्रच राहील - योगी आदित्यनाथ

ABOUT THE AUTHOR

...view details