नागपूर - छत्तीसगड राज्यातील कोहकामेटा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणल्या भुसुरुंग स्फोटात आयटीबीपी म्हणजेच इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसचे जवान मंगेश रामटके यांना वीरमरण आले आहे. मंगेश हे नागपुर जिल्ह्यातील भिवापूर येथील रहिवासी आहेत.
मंगेश हुतात्मा झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण नागपुर जिल्ह्यासह भिवापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आज मंगेश यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मंगेश रामटेके हे 2013 साली वैवाहिक बंधनात अडकले होते. त्यांच्या मागे पत्नी राजश्री आणि सात वर्षीय मुलगा तक्ष सह आई वडील आणि भाऊ असा मोठा परिवार आहे.