सोनीपत (हरियाणा) Bajrang Punia dope test from expired Kit : नाडाच्या टीमनं चाचणीसाठी आणलेलं कीट हे कालबाह्य झाल्याचं बजरंग पुनियाच्या लक्षात आलं. यानंतर बजरंगनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत ही संपूर्ण घटना सांगितली.
खेळाडूंना जाणीवपूर्वक अडकवल जातं : बजरंग पुनिया यानं डोप चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कीटची उपकरणं एकामागून एक दाखवली. त्या सर्वांची मुदत संपली आहे. डोप टेस्टरनं बजरंग पुनियाला व्हिडिओत स्वतःला न दाखवण्याचं आवाहन केलंय. यानंतर पुनिया म्हणतो की, यात तुमची चूक नाही. पण तुमच्या वर जे आहेत ते जाणीवपूर्वक खेळाडूंना अडकवत आहेत.
कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी म्हटले की,नाडाचे लोक डोप टेस्ट करायला आले आहेत. मग ते म्हणतील की खेळाडू डोप सेवन करतात. त्यांनी मुदत संपलेल्या किट आणल्या आहेत. या कीटची मुदत 2 फेब्रुवारी रोजी संपली आहे. आम्ही आंदोलनाला बसलो आहोत तेव्हापासून ते गोळा करण्यासाठी आलेले हे आठवे किंवा नववे टेस्ट्स आहेत. जेव्हा आम्ही कोणतीही स्पर्धा खेळत नव्हतो, ही तेव्हाची गोष्ट आहे. जर खेळाडूंनी नमुने दिले नाहीत तर ते त्यांच्यावर बंदी घालतात. तुम्ही एखाद्या नवख्या मुलाची चाचणी करत असाल तर तो हे तपासणारही नाही. माझ्याकडे डॉक्टरांची टीम आहे, त्यांनी हे तपासलं.