म्हैसूर -प्रियकरासोबत पर्यटनासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता ही मुळची मुंबईची रहिवासी आहे. कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटरवर असलेल्या म्हैसूरमध्ये हा प्रकार घडला. विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासोबत शहरातील चामुंडी टेकडीवर गेली असताना आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपींविरोधात लैंगिक छळाच्या आरोपावरून अलानहल्ली पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी कर्नाटकाचे गृहमंत्र्यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'ती संध्याकाळी सात वाजता तिथे काय करत होती?'
कर्नाटक गृहमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी म्हैसूर सामूहिक बलात्कार पीडितेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "ती संध्याकाळी सात वाजता तिथे काय करत होती?" गृहमंत्र्यांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की ते गृहमंत्र्यांच्या टिप्पण्यांशी सहमत नाहीत आणि मंत्र्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
“गृहमंत्र्यांनी महिलांवर केलेल्या टिप्पण्यांशी मी सहमत नाही. मी त्यांना या विषयावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यांना लवकरच स्पष्टीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत. मी पोलिसांना या प्रकरणातील सर्व घडामोडींची माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. गृहमंत्र्यांनी केलेल्या टिप्पण्यांचे आम्ही समर्थन करत नाही. सरकार या घटनेकडे गांभीर्याने बघेल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, ”असे मुख्यमंत्री म्हणाले.
तर गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे की, ' मी असे काहीही वक्तव्य केलेले नाही, कॉंग्रेस या प्रकरणाचे राजकारण करत आहे. कॉंग्रेस या घटनेतून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्या मुलीने आणि तिच्या मित्राने असे निर्जन ठिकाणी जायला नको होते,' एवढेच म्हटलो होतो.
काय आहे नेमकं प्रकरण -