महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'माय लॉर्ड'ची आवश्यकता नाही, मॅडम म्हटलं तरी चालेल', न्यायमूर्ती ज्योती मुलीमानी यांचे वकिलांना आवाहन - Karnataka High Court

न्यायमूर्ती ज्योती मुलीमानी यांनी वकिलांना 'माय लार्ड नाही तर मॅडम असे बोलावण्याचे', आवाहन केले आहे. 'माय लार्ड' असा उल्लेख न करण्याचे आवाहन करणाऱया त्या दुसऱ्या न्यायधीश आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती कृष्णा भट पंजीगड यांनी त्यांना ‘माय लॉर्ड’ म्हणू नका, असे म्हटले होते.

ज्योती मुलीमानी
ज्योती मुलीमानी

By

Published : Jun 17, 2021, 10:14 AM IST

बंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ज्योती मुलीमानी यांनी वकिलांना 'माय लार्ड नाही तर मॅडम असे बोलावण्याचे', आवाहन केले आहे. सुनावणी दरम्यान वकिलांनी न्यायमूर्ती ज्योती मुलीमानी यांचा 'माय लार्ड' असा उल्लेख केला. यावर माय लार्ड म्हणून संबोधले जाऊ नये अशी भूमिका घेत त्यांनी मँडम म्हणायचे आवाहन केले.

'माय लार्ड' असा उल्लेख न करण्याचे आवाहन करणाऱया त्या दुसऱ्या न्यायधीश आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती कृष्णा भट पंजीगड यांनी त्यांना ‘माय लॉर्ड’ म्हणू नका, असे म्हटले होते. 17 एप्रिल रोजी न्यायमूर्ती कृष्णा भट्ट पंजीगड यांनी माय लॉर्ड किंवा लॉर्डशिप वापरणे योग्य नसल्याचे म्हटलं होते. 'सर' म्हणून ओळखले जाणे प्रतिष्ठित आणि आदरणीय आहे.

माय लॉर्ड संदर्भात 2014 ला सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

न्याायालयात कोणत्याही प्रकरणावरील युक्तिवादादरम्यान वकिल न्यायासनावर बसलेल्या न्यायाधीशांना माय लॉर्ड, युवर लॉर्डशिप, युअर ऑनर असे संबोधतात. कोर्टात न्यायाधीशांना माय लॉर्ड, युअर लॉर्डशिप किंवा युअर ऑनर म्हणणे बंधनकारक नाही, मात्र न्यायाधीशांना आदराने संबोधले पाहिजे,’ असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. लॉर्ड किंवा युअर ऑनर म्हणणे अनिवार्य नाही. फक्त न्यायासनाचा आदर राखण्यात यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होते.

ABOUT THE AUTHOR

...view details