बंगळुरू -एका तरुणाचा वाहतूक पोलिसांशी भर रस्त्यात हुज्जत घालताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तो पोलिसांशी वाद घालताना दिसत असून आपले वडिल आंध प्रदेशमध्ये खासदार असल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ कर्नाटकाच्या उडुपी शहरातील आहे. तो पोलिसांशी आरेरावीची भाषा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाहतूक नियमांचे उल्लघंन करूनही त्याने दंड भरण्यास नकार दिला.
माझे वडिल आंध्र प्रदेशमध्ये खासदार आहेत. आंध्र प्रदेश सरकारचे गृह विभाग सचिव हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत. ते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जवळचे आहेत. मी त्यांना कॉल करतो. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मी ओळखतो. मी का दंड भरू, असे म्हणताना तो तरूण दिसत आहे.