महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Old Man Prove Himself Alive : हद्दच! जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी सहा वर्षांपासून सरकारी कार्यालयात चकरा! - Man Struggling for Six Years Prove Himself Alive

Old Man Prove Himself Alive : एक वृद्ध व्यक्ती जिवंत असताना देखील त्यांना मृत घोषित केल्याची घटना घडली आहे. त्यांच्याच धाकट्या भावानं जमीन हडपण्यासाठी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र बनवल्याची चर्चा सध्या सगळीकडं सुरू आहे. रघुराज (82) वर्ष असं या व्यक्तीचं नाव आहे. गेल्या सहा वर्षापासून प्रशासनाकडं चकरा मारत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केलाय.

Old Man Prove Himself Alive
Old Man Prove Himself Alive

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 8:34 PM IST

मुझफ्फरनगरOld Man Prove Himself Alive : दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेता पंकज त्रिपाठीचा 'कागज' हा चित्रपट सर्वांना आठवत असेल. या चित्रपटात मुख्य पात्र जिवंत असतं मात्र, कागदपत्रांमध्ये मृत घोषित असतं. असाच काहीसा प्रकार मुझफ्फनगरमध्ये घडलाय. एका जिवंत माणसालाच चक्क प्रशासनानं मृत घेषित केलंय. रघुराज (82) वर्ष असं या कागदोपत्री मृत व्यक्तीचं नाव आहे.

बुढाना बिराल गावातील घटना : रघुराज हे, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरचे रहिवासी आहेत. मात्र ते कामानिमित्त हरियाणातील पानिपत येथे राहतात. रघुराज यांचं मूळ गाव मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना बिराल गाव आहे. रघुराज गेल्या सहा वर्षे जिवंत असल्याचा पुरावा प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाखवत आहे. मात्र कोणीही अधिकारी त्यांना दाद देत नाहीय. त्यांच्या या प्रकरणाची कोणीही दखल घ्याला तयार सुद्धा नाही. त्यामुळं त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा इशारा :खरं तर, रघुराज यांची जमीन हडपण्यासाठी यांच्या धाकट्या भावानं त्यांना कागदोपत्री मृत घोषित केलंय. त्यानंतर ही जमीन त्यांच्या नावावर झाली. न्याय न मिळाल्यास लखनौला जाऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आत्महत्या करण्याचा इशारा वृद्ध रघुराज यांनी दिला आहे. रघुराज सांगतात की, त्यांना सहा भाऊ होते. तीन भावांचा मृत्यू झाला आहे. इतर तीन भाऊ जिवंत आहेत. तो भाऊ हरियाणातील पानिपत येथे भाड्याच्या घरात राहतो. मी मजूर म्हणून काम करतो. लहान भाऊ अमन गावात राहतो.

कागदावर मृत घोषित जमीन बळकावली : गावातील जमीन त्यांच्या वाट्याला असल्याचं रघुराज यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांच्या भावानं तत्कालीन महिला अधिकाऱ्याकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं. त्यानंतर त्यांची जमीन वारस हक्कानं भावाच्या नावावर करण्यात आली. सहा वर्षांपूर्वी ते गावात आले असता त्यांना याबाबत माहिती मिळाली. तेव्हापासून ते एकत्रीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारून जिवंत असल्याचा दाखला देत आहेत. मात्र त्यांच कोणीही ऐकत नाहीय.

धाकट्या भावानं बनवलं बनावट मृत्यू प्रमाणपत्र :त्याचा धाकटा भाऊ अमन यानं तत्कालीन एकत्रीकरण अधिकाऱ्याला बनावट मृत्यू प्रमाणपत्र, सुविधा शुल्क देऊन आपल्या नावावर जमीन नोंदवल्याचा आरोप आहे. त्यांना न्याय मिळत नसल्याचं रघुराज सांगतात. यामुळं आता ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी लखनौला जाणार असून तेथूनही न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अधिकारी काय म्हणतात : या प्रकरणात एकत्रीकरण अधिकारी बुधना अनुज सक्सेना यांनी सांगितलं की, रघुराजच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्यापैकी एकानं अर्ज केला होता की ते एकमेव वारसदार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी एकमेव वारस असल्याचा दाखलाही दिला होता. 2018 मध्ये त्याच्या आईचं निधन झालं. यानंतर याप्रकरणी एसडीएमकडं अपील करण्यात आलं होतं. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा प्रशासन अधिकारी नरेंद्र बहादूर सिंह यांनी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती मागवली आहे.

हेही वाचा -

  1. Supriya Sule slammed BJP : सुप्रिया सुळे यांनी संसदेत चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावरून उपस्थित केला प्रश्न
  2. Rahul Gandhi on women reservation: महिला आरक्षणात ओबीसींना आरक्षण देण्याची राहुल गांधींची मागणी, अमित शाह म्हणाले...
  3. Kerala Onam Bumper BR93 Lottery Results : तिरुओणम बंपर लॉटरी सोडत घोषित, 'या' तिकीट क्रमांकाला मिळाला २५ कोटींचा जॅकपॉट...

ABOUT THE AUTHOR

...view details