महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्रित काम करावे- सोनिया गांधी - NCP leader Sharad Pawar

एनडीए सरकारविरोधात समान रणनीती तयार करणे आणि विरोधकांच्या एकजुटीला बळ देण्यासाठी सध्या काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विरोधी पक्षांची ऑनलाईन बैठक बोलाविली.

सोनिया गांधी
सोनिया गांधी

By

Published : Aug 20, 2021, 7:26 PM IST

नवी दिल्ली - विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. त्या 19 विरोधी पक्षांच्या ऑनलाईन बैठकीत बोलत होत्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी व्यवस्थित नियोजनाकरिता काम करावे, असेही काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले आहे.

एनडीए सरकारविरोधात समान रणनीती तयार करणे आणि विरोधकांच्या एकजुटीला बळ देण्यासाठी सध्या काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विरोधी पक्षांची ऑनलाईन बैठक बोलाविली. या विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या, की 2024 लोकसभा निवडणूक हे आव्हान आहे. मात्र, आपण एकत्रितपणे काम करू शकतो. अर्थातच 2024 लोकसभा निवडणूक हे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपण व्यवस्थितपणे नियोजन करण्यास सुरुवात करायला हवी. घटनेवर आणि स्वातंत्र्याच्या चळवळीवर विश्वास असलेले सरकार देशाला देणे हे एकमेव ध्येय हवे.

हेही वाचा-अफगाणिस्तान दुतावासासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून 6 आठवड्यांची स्थगिती

शरद पवारांचीही बैठकीला उपस्थिती-

लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्रित यायला पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा-ट्विटरनंतर फेसबुकनेही राहुल गांधींची काढली पोस्ट, नियमभंग केल्याचे दिले कारण

बैठकीला 19 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित

सोनिया गांधींनी बोलाविलेल्या बैठकीला विविध 19 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन उपस्थित होते. टीएमसी, एनसीपी, डीएमके, शिवसेना, जेएमएमम, सीपीआय, आरजेडी, लोकतांत्रिक आदी पक्षांचे नेते उपस्थित होते.

हेही वाचा-नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ITBP चे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्यासह 2 जवान हुतात्मा

काँग्रेसचे नेते यापूर्वीच्या बैठकीला होते गैरहजर

२०२४मधील लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत लढण्यासाठी तसेच तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल कॉंग्रेसचे यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांची बैठक 22 जून 2021 ला बोलाविली होती. या बैठकीला राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत अनेक मान्यवर हजर राहिले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठकी ही नव्या आघाडीसाठी नव्हती, असे राष्ट्रमंचचे संस्थापक अध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्या बैठकीला काँग्रेसचे नेते गैरहजर राहिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details