महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसंख्येच्या बाबतीत मुस्लिम हिंदूंना मागे टाकू शकतात असा हा केवळ "प्रचार" - कुरैशी - इस्लाम कुटुंब नियोजनाच्या संकल्पनेला विरोध करत नाही

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी (Former Chief Election Commissioner S Y Qureshi) यांनी सोमवारी सांगितले की, इस्लाम कुटुंब नियोजनाच्या संकल्पनेला विरोध करत नाही (Islam does not oppose the family planning) आणि लोकसंख्येच्या बाबतीत मुस्लिम हिंदूंना मागे टाकू शकतात (Muslims can overtake Hindus) असा हा केवळ "प्रचार" आहे.

S Y Qureshi
एस वाय कुरैशी

By

Published : Mar 29, 2022, 9:25 AM IST

नवी दिल्ली: इस्लाम कुटुंब नियोजनाच्या संकल्पनेला विरोध करत नाही आणि लोकसंख्येच्या बाबतीत मुस्लिम हिंदूंना मागे टाकू शकतात असा हा केवळ "प्रचार" आहे, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी यांनी सोमवारी सांगितले. भारतातील मुस्लिम लोकसंख्येबद्दल अनेक मिथक पसरवले जात आहेत ज्यामुळे हिंदूंमध्ये मुस्लिमांविरुद्ध शत्रुत्व निर्माण होत आहे, असे कुरैशी यांनी इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे "लोकसंख्या मिथ: इस्लाम, फॅमिली प्लॅनिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया" या पुस्तकावरील चर्चेदरम्यान सांगितले.

भारतातील मुस्लिम लोकसंख्येबद्दलच्या "मिथकांची" यादी करताना, ते म्हणाले की त्यापैकी एक म्हणजे ते खूप मुले निर्माण करतात आणि लोकसंख्येच्या स्फोटासाठी ते पूर्णपणे जबाबदार आहेत. "होय मुस्लिमांमध्ये कुटुंब नियोजनाचा स्तर 45.3 टक्के इतका सर्वात कमी आहे. त्यांचा एकूण प्रजनन दर 2.61 आहे, जो सर्वात जास्त आहे. पण हिंदूही मागे नाहीत त्यांचा कुटुंब नियोजनाचा स्तर 54.4 टक्वे असुन प्रजनन दर 2.13 टक्के आहे. यात त्यांचा दुसरा क्रमांक आहे. कुरैशी म्हणाले की, मुस्लिम लोकसंख्या वाढीमुळे लोकसंख्येचा समतोल बिघडत आहे हे देखील एक मिथक आहे.

भारतातील लोकसंख्येचे प्रमाण खरे तर मुस्लिमांमध्ये 1951 मधील 9.8 टक्क्यांवरून 2011 मध्ये 14.2 टक्क्यांपर्यंत वाढ दर्शवते आणि हिंदूंमध्ये 84.2 टक्क्यांवरून 79.8 टक्क्यांपर्यंत घसरले, परंतु 60 वर्षांत ही 4.4 टक्के वाढ झाली आहे. त्यानी निदर्शनास आणून दिले की, हिंदूंच्या तुलनेत मुस्लिम अधिक वेगाने कुटुंब नियोजन स्वीकारत आहेत. त्यांच्या मुलांच्या संख्येतील अंतर कमी होत आहे. राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी हिंदू लोकसंख्येला मागे टाकण्याचा मुस्लिमांचे संघटित षडयंत्र असल्याचा आणखी एक प्रचार आहे, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, कोणत्याही मुस्लिम नेत्याने किंवा विद्वानांनी हिंदूंना मागे टाकण्यासाठी मुस्लिमांना जास्त मुले निर्माण करण्यास सांगितले नाही.

दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक दिनेश सिंग, आणि अजय कुमार यांच्या गणिताच्या मॉडेलचा दाखला देत ते म्हणाले की मुस्लिम हिंदूंना "कधीच मागे टाकू शकत नाहीत". आणखी एक "मिथक" बद्दल बोलताना ते म्हणाले की, मुस्लिम वाढत्या लोकसंख्येसाठी बहुपत्नीत्वाचा वापर करतात हे सांगणे चुकीचे आहे कारण 1975 मध्ये सरकारी अभ्यासात असे आढळून आले की सर्व समुदायांमध्ये बहुपत्नीत्व होते परंतु त्यात मुस्लिम समाजात सर्वात कमी बहुपत्नीत्व होते. इस्लाम बहुपत्नीत्वाला प्रोत्साहन देतो असा सर्वसाधारण गैरसमज आहे पण वास्तव मात्र वेगळे आहे.

बहुपत्नीत्व भारतात देखील सांख्यिकीयदृष्ट्या शक्य नाही कारण लिंग गुणोत्तर (1,000 पुरुषांमागे केवळ 924 महिला) त्याला परवानगी देत ​​नाही. इस्लाम कुटुंब नियोजनाच्या विरोधात नाही, कुराणमध्ये कोठेही कुटुंब नियोजनाला मनाई नाही आणि फक्त व्याख्या आहेत कुराणातील असंख्य श्लोक आणि हदीसमधील उद्धृत संख्येपेक्षा गुणवत्तेवर, स्त्रिया आणि मुलांचे आरोग्य आणि मुलांचे चांगले संगोपन करण्याचा अधिकार यावर जोर देतात. इस्लाम केवळ कुटुंब नियोजनालाच विरोध करत नाही तर खरे तर या संकल्पनेचा प्रणेता आहे, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल एन एन वोहरा, माजी आरोग्य सचिव के सुजाता राव आणि द पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक पूनम मुत्रेजा यांनीही पुस्तक चर्चेत भाग घेतला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details