महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Loudspeakers Azaan : मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजान न देण्याचा मुस्लिम संघटनांचा निर्णय - गोवर्धन शहरातील मशिदीवरील लाऊडस्पीकर काढले

मथुरा जिल्ह्यातील गोवर्धन शहरात मशिदीतील लाऊडस्पीकरवरून अजान बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू संघटनेच्या लोकांनी मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. आज हिंदू संघटनेचे लोक जमताच, त्याच दरम्यान मुस्लिम लोकांनी मशिदीतील लाऊडस्पीकर काढून टाकले. त्यांनी लाऊडस्पीकरवरून अजान न करण्याचे जाहीर केले.

Loudspeakers Azaan
मशीद

By

Published : Apr 16, 2022, 10:07 PM IST

मथुरा - जिल्ह्यातील गोवर्धन शहरात मशिदीतील लाऊडस्पीकरवरून अजान बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू संघटनेच्या लोकांनी मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. आज हिंदू संघटनेचे लोक जमताच, त्याच दरम्यान मुस्लिम लोकांनी मशिदीतील लाऊडस्पीकर काढून टाकले. त्यांनी लाऊडस्पीकरवरून अजान न करण्याचे जाहीर केले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता पुढील आदेशापर्यंत मशिदीतून लाऊडस्पीकरवरून अजान होणार नाही.

लाऊडस्पीकरवरून अजान न देण्याचा निर्णय

सध्या वातावरण पाहता मशिदीवरील लाऊडस्पीकर काढण्यात आले आहेत. यानंतर मशिदीच्या अधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवरून अजान न देण्याचा निर्णय घेतला. आता जिल्हा प्रशासन पुढील आदेश देत नाही तोपर्यंत लाऊडस्पीकरवरून अजान होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मशिदीबाहेर हनुमान चालीसा पठण - हिंदू वाहिनी संघटनेचे श्याम सुंदर उपाध्याय यांनी सांगितले की, हनुमान जयंतीच्या दिवशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीखाली येऊन हनुमान चालीसा करण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले की, शहरात एकही मशीद नाही. लोकांना त्रास देण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर केला जातो. इथे ना मुस्लिमांची वस्ती आहे ना मशिदीचे स्वरूप. त्यानंतरही हिंदूंना त्रास देण्यासाठी लाऊडस्पीकरद्वारे दिवसातून ५ वेळा अजान दिली जाते

लाऊडस्पीकरवरून अजान न देण्याचा निर्णय - आता मशिदीतून लाऊडस्पीकर हटवण्यात आले असून, तेथे अजान होणार नाही. अन्वर हुसेनने सांगितले की, रात्रीही पोलीस आले होते आणि लाऊडस्पीकर बंद करा, असे सांगितले. जातीय सलोखा राखण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली असून, काही संघटनांचे लोक येथे जमले आणि घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना ज्याप्रकारे आंदोलनाचे वातावरण निर्माण करायचे आहे, ते पाहता मशिदीतून लाऊडस्पीकर काढून लाऊडस्पीकरवरून अजान न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details