कुशीनगर (उ.प्र) -भाजपचा प्रचार करणाऱ्या एक युवकाला निर्घूणपणे मारहाण ( BJP win celebration Babar death ) केल्याची घटना जनपदच्या रामकोला ठाण्याच्या कठघरही गावातून समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबर असे युवकाचे नाव आहे.
हेही वाचा -केंद्रीय ट्रेड युनियनकडून आजपासून 2 दिवसीय भारत बंदचे आवाहन, बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता
बाबरच्या कुटुंबीयानुसार, यूपी विधानसभा निवडणूक 2022 मध्ये बाबरने भाजपचा प्रचार केला होता. यामुळे शेजारील पट्टीदार हे संतापले होते. त्यांनी अनेकदा बाबरला भाजपचा प्रचार करण्यासाठी मनाई केल होती आणि न मानल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती. याची तक्रार बाबरने रामकोला ठाण्यात केली होती. मात्र, कुठलीही कारवाई न झाल्याने त्यांची हिम्मत वाढली. 20 मार्चला दुकानातून परत आल्यानंतर बाबरने 'जय श्री राम' चा नारा लावला, तेव्हा पट्टीदार अजीमुल्लाह, आरिफ ताहिद, परवेज भडकले आणि त्यांनी आपल्या साथिदारांसह बाबरवर हल्ला केला.