वाराणसी - वाराणसीतील परंपरेला अनुसरुन विशाल भारत संस्थानशी संबंधित मुस्लीम महिलांनी शनिवारी भगवान श्रीराम यांची प्रार्थना केली व आरती केली. प्रभू श्रीरामांनी मानवी अवतार घेतला आणि पृथ्वीला दहशतीपासून मुक्त केले. जेव्हा ते अयोध्येत परत आले तेव्हा दिवाळी साजरी केली गेली, अशी लोकांची श्रद्धा आहे. महंत बालक दासजी महाराज हे श्रीराम महाआरती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
गेल्या 14 वर्षांपासून वाराणसीच्या मुस्लीम महिला जातीय सलोखा, बंधुता आणि भारतीय सांस्कृतिक ऐक्य सांगत दीपावली व राम नवमीला सातत्याने ही महाआरती करीत आहेत.
हेही वाचा -धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील नागरिकांनी खरेदी केले 20 हजार कोटींचे सोने - आयबीजेए
आज धार्मिक आधारावर पसरवण्यात आलेल्या दहशतवादाच्या अंधाराने संपूर्ण जग व्यापले आहे. अशा परिस्थितीत विश्वास आणि भक्ती ही दहशतवादाला आव्हान देऊ शकते आणि रोखू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
यानिमित्ताने इंद्रेश नगरमधील मुस्लीम महिलांनी रांगोळीही काढली. तसेच, रंगीबेरंगी दिवे लावून परिसर सजविला. नाझनीन अन्सारी यांनी श्रीराम आरती सादर केली.
या कार्यक्रमाविषयी बोलताना नाझनीन म्हणाल्या, 'आज आपण सर्वांनी मिळून प्रभू श्रीराम यांची आरती केली. कारण, जो कोणी भारतात जन्मला आहे, त्यांचे पूर्वज प्रभू श्रीराम आहेत आणि आम्ही 'सबके राम' या घोषवाक्याचे पालन करतो. आमचे ध्येय धार्मिक भेदभाव दूर करण्याचे आहे.' या मुस्लीम महिलांनी लयबद्ध पद्धतीने आरती करत जगाला भारताची सांस्कृतिक अखंडता दर्शविली.
हेही वाचा -सीआयकेचे अनंतनाग जिल्ह्यातील बाजभारामध्ये विविध ठिकाणी छापे