हावडा -प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ( Protest against Prophet Muhammad ) देशात ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. आज सकाळी पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात हिंसाचार उसळला आहे. पांचाला बाजार येथे पोलीस तसेच आंदोलकांमध्ये चकमक ( Fresh clash between Police and protesters ) झाल्याची घटना घडली आहे. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तत्पूर्वी, शुक्रवारीही आंदोलकांनी शहरात रास्ता रोको केला होता.
आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न - पाचळा बाजारात आज सकाळी आंदोलनकर्ते जमा झाले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी पोलिसांवरदगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. मात्र, आंदोलकांनी दगडफेक सुरूच ठेवली. याआधी शुक्रवारी धुलागड, पांचला तसेच उलुबेरिया येथे आंदोलकांची पोलिसांशी चकमक उडाली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी धुलागड तसेच पाचला येथे लाठीमार केला होता.
दगडफेकीमुळे अनेक वाहनांचे नुकसान - या भागात आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ देशातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम समाजाची निदर्शने सुरू आहेत. दिल्ली, कोलकाता, हावडा, प्रयागराज, हैदराबाद, सहारनपूरसह इतर शहरांमध्ये नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी होते आहे.
दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुपूर शर्मा यांना फाशी द्यायला हवी, अशी मागणी ( MIM State President Imtiaz Jalil ) केली आहे. पक्षातर्फे त्यांच्यावर फक्त करवाई करणे योग्य नाही, अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे, जलील म्हणाले. कोणत्याही जाती-धर्माबाबत आक्षेपाहार्य वक्तव्य करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी केंद्राने वेगळा कायदा ( Center separate law ) केला पाहिजे. असे वक्तव्य केल्यावर फक्त पक्षातर्फे कारवाई कारवाई केली म्हणजे झाल का?. नुपूर शर्मा यांना इतक सहज सोडून देणे योग्य नाही. या कारवाईवर जगात कोणीही संतुष्ट नाही, असे जलील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
हेही वाचा- Bjp Big Wins In RS Polls : भाजपचा राज्यसभेत मोठा विजय, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दिला जोरदार धक्का