लखनऊ (उत्तर प्रदेश) -मुस्लिम धर्मगुरु मौलाना डॉ. कल्बे सादिक यांचे मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) निधन झाले. वरिष्ठ शिया धर्मगुरु व ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष मौलाना डॉ. कल्बे सादिक हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. लखनऊ येथील एरा मेडिकल कॉलेजच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मेडिकल काॅलेजकडून सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) मेडिकल बुलेटिननंतर सांगण्यात आले होते की, त्यांचे दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाले आहे. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मौलाना कल्बे सादिक यांनी एरा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
17 नोव्हेंबरला झाले होते रुग्णालयात दाखल
त्यांना 17 नोव्हेंबरला श्वसनास त्रास होत असल्याने तसेच न्यूमोनियामुळे एरा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एरा मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांच्या तपासणी नंतर न्यूमोनियासह त्यांच्या मुत्राशयात दोष आढळला. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली व त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 81 वर्षीय मौलाना कल्बे सादिक ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि अशिया खंडातील एक मोठे इस्लामिक अभ्यास होते. मौलाना कल्बे सादिक यांच्या निधनाच्या वृत्ताची माहित त्यांचा मुलगा सिब्तैन नूरी यांनी दिली.
मौलाना कल्बे सादिक यांचा मुलगा कल्बे सिब्तैन नूरी म्हणाले, मौलाना यांना कर्करोग होता. यावर प्रथम मेदांता नंतर लखनऊ येथील एरा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र न्युमोनिया व इतर आजारामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली.