बिजनौर -श्री रामजन्म भूमि निर्माणसाठी बिजनौरमध्ये मुस्लिम कुटूंबाने राम मंदिरासाठी वर्गणी देणे चांगलेच महागात पडले आहे. येथे काही मुस्लिम कट्टरपंथियांनी वर्गणी देणाऱ्या लोकांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. पीडित कुटूंबाने पोलिसात जाऊन याची तक्रार केली मात्र पोलिसांनी आरोपींविरुद्ध अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.
राममंदिर निर्माणसाठी मुस्लिम कुटूंबाने दिली वर्गणी, शेजाऱ्यांनी केली मारहाण - राम मंदिरासाठी वर्गणी
यूपीमधील बिजनौरमध्ये राम मंदिरासाठी वर्गणी दिल्यामुळे शेजाऱ्यांनी मुस्लिम परिवाराला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणवरून राजकीय वातावरण गरम होताना पाहून पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितले, की अजूनपर्यंत अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही. दोषींवर कारवाई केली जाईल.
राम मंदिरासाठी मुस्लिम समुदायाने दिली वर्गणी -
7 मार्च रोजी बिजनौरमध्ये आरएसएस प्रचारक इंद्रेश कुमार जे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक आहेत म्हणाले, काही मुस्लिम परिवारांनी अयोध्या येथे निर्माणाधीन राम मंदिरासाठी वर्गणी दिली. या कार्यक्रमात तीन मुलांनी आपला गल्ला (गुल्लक) ही दिलाय
वर्गणी दिल्याने नाराज समुहाची मारहाण
पीडिता तसलीम फातिमा यांनी आरोप केला आहे, की काही लोकांनी घरात घुसून त्यांना मारहाण केली. मुस्लिमांमधील दुसरा गट वर्गणी दिल्यामुळे त्यांच्यावर नाराज होता. राष्ट्रीय मुस्लिम मंच चे प्रचारक मिसाल मेहंदी यांचा आरोप आहे की, मुस्लिम समूह सोशल मीडियावर धमकी देत आहे. अश्लील शेरेबाजी करत आहे. याप्रकरणी ते लवकरच लखनऊला जाऊन डीजीपीकडे तक्रार करणार आहेत.