लखनौ - उत्तर प्रदेशात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने ( Five family members murder ) एकच खळबळ उडाली आहे. नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील खगलपूर गावात शुक्रवारी रात्री एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून ( murder of five persons in prayagraj ) आले आहेत. घरामध्ये सापडलेल्या पाच मृतदेहांपैकी चार जणांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.
गंगा परिसरात पुन्हा एकदा सामुहिक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खगलपूर गावात ( nawabganj police station area prayagraj ) शुक्रवारी रात्री उशिरा एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात ( Prayagraj murder news ) आली. यापैकी चौघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. तर कुटुंबप्रमुखाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. महिला आणि तिच्या तीन मुलींची एकामागून एक धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. तर कुटुंबप्रमुखाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
कुटुंब प्रमुखानेच हत्या केली का?-मृतांमध्ये राहुल तिवारी, त्याची पत्नी प्रीती, तीन मुली माही, पिहू आणि पोहू यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सोबतच श्वानपथक आणि फील्ड युनिटची टीम घटनास्थळी पोहोचून तपास करत आहे. कुटुंबप्रमुखाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे पत्नी व मुलांची हत्या करून त्यानेच गळफास घेतला असावा, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र, या घटनेबाबत पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. घटनेच्या तपासानंतरच हत्येचे कारण स्पष्ट होणार आहे.