महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Murder In Superstition : बळी दिल्यावर मोठा मुलगा बरा होण्याचे स्वप्न पडायचे; अंधश्रद्धेपायी मातेनी केली पोटच्या पोरीची हत्या - murder in superstition

समाजातील एक वर्ग अजूनही अंधश्रद्धेत (murder in superstition ) जगत आहे. अंधश्रद्धेचे असेच एक प्रकरण बरान जिल्ह्यात समोर आले आहे. जिल्ह्यातील अंता भागात मोठ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने आपल्या लहान मुलीचा गळा दाबून खून (mother killed daughter ) केला. पोलिसांनी माहिती मिळताच आरोपी आईला अटक (daughter killer mother arrest Rajasthan) केली. आरोपींच्या चौकशीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Murder In Superstition
आरोपी महिलेला अटक

By

Published : Nov 6, 2022, 6:43 PM IST

बरान (राजस्थान) : एकविसाव्या शतकात जिथे समाज मुला-मुलींच्या समान हक्काच्या गप्पा मारत आहे, तिथे समाजातील एक वर्ग अजूनही अंधश्रद्धेत (murder in superstition ) जगत आहे. अंधश्रद्धेचे असेच एक प्रकरण बरान जिल्ह्यात समोर आले आहे. जिल्ह्यातील अंता भागात मोठ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने आपल्या लहान मुलीचा गळा दाबून खून (mother killed daughter ) केला. पोलिसांनी माहिती मिळताच आरोपी आईला अटक (daughter killer mother arrest Rajasthan) केली. आरोपींच्या चौकशीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुलीच्या हत्याकांडाची माहिती सांगताना

बळी देण्यासाठी पतीवर केला होता हल्ला -डीएसपी तरुण कांत सोमाणी यांनी सांगितले की, आरोपी महिलेच्या चौकशीदरम्यान हे समोर आले आहे की, आरोपी महिला रेखा हाडा हिचे 16 वर्षांच्या मोठ्या मुलावर प्रेम होते. परंतु त्याच्या तब्येतीमुळे ती नेहमीच काळजीत असायची. त्यामुळे त्यांची मानसिक स्थितीही चांगली नव्हती. आरोपी महिलेने सांगितले की, तिला स्वप्न पडायचे की जर ती कोणाचा बळी देईल तर तिचा मोठा मुलगा बरा होईल. अशा स्थितीत आरोपी महिलेने काही दिवसांपूर्वी तिचा पती शिवराज याच्यावरही धारदार शस्त्राने वार केले होते, मात्र तो जागे झाल्याने तो बचावला होता.

पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या -या महिलेने शनिवारी 12 वर्षांची मुलगी संजना आणि 7 वर्षांचा लहान मुलगा सिंघम यांच्यावर हल्ला केला. धाकटा मुलगा सिंघमने कसा तरी जीव वाचवून पळ काढला, मात्र मुलगी संजनाला महिलेने पकडून तिचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details