धारवाड बल्लारी पोलिसांनी खून प्रकरणातील आरोपी बच्चा खान याला शनिवारी धारवाड येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी परत जाण्यापूर्वी आरोपीला त्याच्या प्रेयसीसह हॉटेलच्या खोलीत राहण्याची परवानगी दिली Murder Accused Allowed To Stay With Lover. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिसही त्या ठिकाणी पहारा देत होते.
बच्चा खानची प्रेयसी बेंगळुरूहून आली होती आणि आधीच खोलीत त्याची वाट पाहत होती. तथापि, हुबळी गोकुळा रोड पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांची माहिती गोळा केली होती आणि खुनाच्या आरोपीला त्याच्या प्रेयसीसह लॉजमध्ये राहण्याची परवानगी देणाऱ्यांना बेड्या ठोकल्या.