महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'देशात गोडसेचे भक्त जास्त, तर गांधींचे अनुयायी कमी झालेत!'

फ्रान्समधील हत्येप्रकरणी मुनव्वर राणा यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशातील हजरतगंज येथे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यासर्व प्रकरणानंतर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी कवी मुनव्वर राणा यांच्याशी संवाद साधला.

मुनव्वर राणा
मुनव्वर राणा

By

Published : Nov 7, 2020, 4:49 PM IST

लखनऊ - पाच वर्षांपूर्वी दादरीत गोमांसाच्या मुद्द्यावरून झालेल्या अखलाकच्या हत्येनंतर देशभरात 'असहिष्णुते'च्या वादाला तोंड फुटले आणि पुरस्कार वापसीला सुरुवात झाली होती. तेव्हा प्रसिद्ध शायर, कवी मुनव्वर राणा यांनी आपला साहित्य पुरस्कार परत केला होता. तेव्हापासून विविध कारणांमुळे ते चर्चेत आहेत. नुकतेच फ्रान्समधील घटनांच्या पार्श्वभूमीवर राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशातील हजरतगंज येथे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यासर्व प्रकरणानंतर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी कवी मुनव्वर राणा यांच्याशी संवाद साधला.

कवी मुनव्वर राणा यांची खास मुलाखत

देशात विरोधी पक्षांचे कंबरडे मोडले आहे. सत्तेत बसलेले लोक हिंदू-मुस्लीम करीत आहेत. सत्तेत बसलेल्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते, बाबरने हे केले, नेहरूंनी चूक केली, अशी उत्तरे देतात. देशात गोडसे यांच्या विचारांनी बरेच लोक प्रभावित आहेत. तर, गांधींचे अनुयायी कमी झाले आहेत, असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते मुनव्वर राणा?

व्यंगचित्र हे प्रेषित मोहंमद आणि इस्लामचा अवमान करणारे होते. फ्रान्समधील लोकांची प्रतिक्रिया साहजिक होती. मी त्याठिकाणी असतो तर, कदाचित मीसुद्धा तसाच वागलो असतो, असेही राणा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सामाजिक सौहार्द बिघडल्याचा दावा करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली.

प्रेषित मोहम्मद पैगंबर व्यंगचित्र वाद -

फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लीम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्यॅन्युअल मॅक्रान यांनी या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला.

ABOUT THE AUTHOR

...view details