देहरादून (उत्तराखंड) -मुंबईतील एका महिलेने देहरादून येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक केल्याची ( Mumbai women cheated Dehradun businessman ) घटना घडली आहे. महिलेने व्यापाऱ्याबरोबर जमिनीचा शासकीय करार पत्र बनवून त्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. पीडितच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा -KCR In Delhi : मोदींच्या विरोधात तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न जोरात.. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर दिल्लीकडे रवाना
असा झाला व्यवहार -संजय नेगी यांनी फिर्याद दिली की, ते एक व्यावसायिक असून काही वर्षांपूर्वी त्यांची आरबी लक्ष्मी रोडवर राहणाऱ्या कुमुद डी वैध या महिलेशी भेट झाली. ही महिला सध्या मुंबईतील सूरज बाळकेश्वर रोड येथे राहते. कुमुदने लालपूर रायपूरमधील 36 बिघा जमीन संजय नेगी आणि त्यांची पार्टनर मनू रिटर्न यांना विकण्याची ऑफर दिली आणि संजय नेगी यांनी ही ऑफर स्वीकारली. ऑफर स्वीकारल्यानंतर संजय नेगी यांनी 4 आणि 9 सप्टेंबर रोजी एकूण दीड कोटी रुपये दिले. त्यानंतर 31 सप्टेंबर 2017 रोजी त्यांनी कुमुद डी वैद्य हिला एक कोटी रुपये दिले.
अशी झाली फसवणूक- संजय नेगी यांनी पैसे दिल्यानंतर दोघांमध्ये करार झाला आणि जमीन वादमुक्त असल्याचे महिलेने सांगितले. संजय नेगी यांनी जमिनीची ३० वर्षांची माहिती काढल्यानंतर ती जमीन कुमुदच्या मालकीची नसून, ती जमीन यापूर्वी देखील विकल्याचे आढळून आले. याप्रकरणी संजय नेगी यांनी नंतर महिलेशी संपर्क साधला असता तिने टाळाटाळ सुरू केली. यानंतर महिलेने बनावट कागदपत्रे तयार करून संजय नेगी यांना जमीन विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यानंतर संजय नेगी यांनी माहिती घेतल्यानंतर कळले की, कुमुद वैद्य आणि तिच्या कुटुंबीयांनी ही जमीन यापूर्वी चहाबागेच्या सीलिंगमधून मोकळी केली होती. या उलट महिलेने ती जमीन निवासी जमीन म्हणून विकली होती. महिलेला भेटण्यासाठी संजय नेगी मुंबईला गेले, मात्र महिलेने फोन उचलला नाही.
संजय नेगी यांच्या तक्रारीच्या आधारे कुमुद डी वैद्य या महिलेविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याची माहिती, रायपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अमरजीत सिंह यांनी दिली.
हेही वाचा -Price of Petrol & Diesel : इंधन दराचा भडका! पेट्रोल 118 पार, तर डिझेल 103 प्रति लिटर