धौलपूर (राजस्थान) Rajasthan Gang Rape : राजस्थानच्या धौलपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथे मुंबईतील एका २८ वर्षीय महिलेवर लग्नाचं आमिष दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेनं मुख्य आरोपीसह ६ जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यासह पीडितेनं राष्ट्रपती, राज्यपाल आणि राजस्थानचे एडीजी यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रकरणाची चौकशी सुरू : घटनेचा तपास करत असलेले सीओ सुरेश सांखला यांनी सांगितलं की, मुंबईतील एका महिलेनं सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिनसह सहा जणांची नावं आहेत. पीडित महिलेचे जबाब घेण्यात येत आहेत. या महिलेचं मेडिकल बोर्ड करणार असून, पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत. या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दागिने आणि रोकडही लंपास : महिला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पीडित महिलेनं सांगितलं की, तीन वर्षांपूर्वी तिची राजस्थानच्या धौलपूर शहरात राहणाऱ्या सचिन नावाच्या तरुणाशी ओळख झाली. सचिन मुंबईत नोकरी करायचा. दोघांची मैत्री झाली. पीडितेनं रिपोर्टमध्ये आरोप केला आहे की, ३ महिन्यांपूर्वी सचिननं तिला लग्नाच्या बहाण्यानं ट्रेननं धौलपूरला आणलं. तेथे पोहोचल्यानंतर सचिननं पीडितेकडून दीड लाख रुपयांचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड काढून घेतली.