महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tourist Girl Raped In Shimla : शिमला फिरायला गेलेल्या मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर टॅक्सी चालकाचा बलात्कार - तरुणीवर टॅक्सी चालकाने बलात्कार केल्याने खळबळ

शिमल्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर टॅक्सी चालकाने बलात्कार केल्याने खळबळ उडाली. शिमल्यातील कुफरी फिरुन आल्यानंतर टॅक्सी चालकाने पुन्हा फिरायला नेण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेत अत्याचार केला.

Tourist Girl Raped In Shimla
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 10, 2023, 5:42 PM IST

शिमला :उन्हाळ्याच्या सुट्टीत शिमल्यातील कुफरी येथे फिरण्यास गेलेल्या मुंबईतील अल्पवयीन तरुणीवर टॅक्सी चालकाने बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन गोरेगाव येथे बलात्कारासह पोक्सोच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तो शिमल्यातील थियोग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस नराधम टॅक्सी चालकाचा शोध घेत आहेत. अमन असे त्या टॅक्सी चालकाचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कुटुंबासह अल्पवयीन तरुणी गेली होती शिमल्यात :मुंबईतील गोरेवाग परिसरातील अल्पवयीन तरुणी शिमल्याला एप्रिल महिन्यात फिरायला गेली होती. यावेळी या कुटूंबाने हरियाणा पासींगची स्विफ्ट डिजायर कार (HR 45D 6069) ही टॅक्सी फिरण्यासाठी बुक केली होती. हे कुटूंब 8 ते 15 एप्रिलच्या दरम्यान शिमला, कुफरी या परिसरात फिरत होते. कुटूंबियांसह ही अल्पवयीन तरुणीही फिरत होती.

असा घडला अत्याचाराचा प्रकार : गोरेगावातील हे कुटूंब शिमल्यात फिरायला गेले असता हा प्रकार घडला आहे. ही तरुणी 13 एप्रिल रोजी कुफरी येथे फिरुन आल्यानंतर टॅक्सीचालक अमनने तिला टॅक्सीत लिहिलेला फोन क्रमांक लिहून घेण्यास सांगितले. त्यानंतर त्याला कॉल करण्यास सांगितल्याने अल्पवयीन तरुणीने त्याला रात्री फोन केला. यावेळी संधीचा फायदा घेत टॅक्सीचालक अमनने अल्पवयीन तरुणीला फिरायला जाण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे प्रचंड घाबरलेल्या तरुणीने या दुष्कृत्याची माहिती आपल्या कुटूंबाला दिली नाही.

मुंबईत परतल्यावर सांगितली आपबिती :पीडित अल्पवयीन तरुणी मुंबईत परतल्यानंतर तिने टॅक्सी चालकाने अत्याचार केल्याची माहिती आपल्या कुटूंबियांना दिली. त्यामुळे तिच्या वडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तात्काळ गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलीस ठाण्यात भांदवी कलम 376 आणि पोक्सोच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांनी शून्य एफआयआर अंतर्गत हे प्रकरण थिओगकडे वर्ग केले. थिओग पोलिसांनी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून आयपीसी कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

हिमाचल बाहेरील आहे नराधम टॅक्सी चालक :१३ एप्रिलच्या रात्री पीडितेने टॅक्सी चालकाला फोन केल्यानंतर नराधम चालकाने तिला फसवले. आपल्यासोबत रात्री फिरायला नेत निर्जन जागा मिळाल्यानंतर आरोपी चालकाने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणातील टॅक्सी चालक हिमाचल बाहेरील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या थिओग पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजीव गांधी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details