म्हैसूर -आपल्या प्रियकरासोबत पर्यटनासाठी गेलेल्या मुंबई येथील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटर असलेल्या म्हैसूरमध्ये हा प्रकार घडला. विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासोबत शहरातील चामुंडी टेकडीवर गेली असताना आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपींविरोधात लैंगिक छळाच्या आरोपावरून अलानहल्ली पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून त्यांनी पोलीस महासंचालकाला एक पत्रही लिहिले आहे.
याप्ररकरणी आतापर्यंत कोण काय म्हणाले....
- राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलीस महासंचालकांना पत्र
राष्ट्रीय महिला आयोगाने म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कर्नाटक पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून आरोपींना लवकरात लवकर पकडून पीडितेला न्याय द्यावा, असे म्हटलं आहे. तसेच कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही याप्रकरणी पत्र पाठवण्यात आले आहे. एफआयआर नोंदवला गेला असताना अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कर्नाटक पोलिसांनी वेगाने तपास करून न्याय द्यावा, असे रेखा शर्मा यांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
- आरोपींना लवकरच अटक केली जाईल - पोलीस आयुक्त
कर्नाटक पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था विभागातील अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांना तिथे काही बियर बॉटल सापडल्या. पोलीस परिसरात असलेल्या बियर शॉपमधून सीसीटीव्ही फूटेज घेणार असून आरोपींना शोधतील. या प्रकरणी सविस्तर माहिती उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. ही एक नाजूक बाब आहे. सर्व माहिती उघड करू शकत नाही. या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. लैंगिक छळाच्या आरोपावरून अलानहल्ली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. चंद्रगुप्त यांनी दिली.
- दोषींवर कठोर कारवाई - कर्नाटकचे मुख्यमंत्री
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हैसूरला पाठवले - गृहमंत्री