मुंबई -मायानगरी मुंबईत अनेक तरुण-तरुणी बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी ( To try your luck in Bollywood ) येत असतात. मोठी अभिनेत्री बनायचे अशी खुणगाठ बांधून एक तरूणी कोलकात्याहून घरातून पळून ( young girl ran Away from home ) मुंबईत आली होती. गोरेगावमध्ये एका ओळखीच्या व्यक्तीकडे पेईंगगेस्ट म्हणून राहू लागली. त्यानंतर तिने स्ट्रगल करायला सुरूवात केली. मात्र कोलकत्यात कुटुंबीय चिंतेत पडले असल्याने त्यांनी पोलिसांत तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली ( family report a missing complent to the police ) . अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तिचा शोध घेऊन त्या तरूणीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
तपासात सुरूवातीला तरूणीचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आला. तरूणीला कोलकात्याहून मुंबईत आणण्यात आले. आणि तिला गोरेगावच्या मोतीलाल नगरात ठेवण्यात आले. असा निष्कर्ष पोलिसांनी लावला होता. याबाबत कोलकाताच्या डोमजुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-11 च्या पथकाला मिळाली होती. मात्र त्यानंतर सदर तरुणी अल्पवयीन नसून तिला अभिनेत्री बनायचे होते. त्यासाठी ती कोलकात्याहून मुंबईला पळून आली होती. इथे आल्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीकडे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती असे तिने पोलिसांना सांगितले.