महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rishikesh Car Accident : ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर मुंबईतील भाविकांची कार दरीत कोसळली; चार जणांचा मृत्यू

ऋषिकेश बद्रीनाथ Rishikesh Badrinath मार्गावर rishikesh road accident आज एक मोठा अपघात झाला. एक कार खोल दरीत कोसळली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू Four people died झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील लोक मुंबईचे रहिवासी होते. गंभीर जखमींना एम्स ऋषिकेशमध्ये पाठवण्यात आले आहे. mumbai pilgrims car fell into ditch in rishikesh badrinath road many died अपघातातील मृत व्यक्ती दहीसर, कोळीवाडा वसई, ठाणे, पालघर येथील रहीवासी आहेत.

Rishikesh Car Accident
ऋषिकेश कार अपघात

By

Published : Sep 9, 2022, 10:10 AM IST

Updated : Sep 9, 2022, 1:08 PM IST

ऋषिकेश : बद्रीनाथ मार्गावरील Rishikesh Badrinath ब्रह्मपुरीजवळ झालेल्या अपघातातील rishikesh road accident मृतांची संख्या तीनवरून चार Four people died झाली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. गाडीतील सर्व जण बद्रीनाथ धाम दर्शनासाठी जात होते. हे सर्व जण महाराष्ट्रतील असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तर कार चालक रविंद्र सिंग पुत्र ज्ञान सिंग उखीमठ जिल्हा रुद्रप्रयागचा रहिवासी आहे, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील भाविकाची कार दरीत कोसळी

चार जणांचा मृत्यू -चालक रवींद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 5 प्रवासी हरिद्वारहून बद्रीनाथ धामसाठी निघाले होते. ब्रह्मपुरीजवळ अचानक कारचालकाचे नियंत्रण सुटून कार दरीत कोसळली. पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मुनीचे रेती रितेश शाह यांनी सांगितले की, जखमींना सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. शिवाजी बाबाजी बुधकर (दहिसर, मुंबई), पुरुषोत्तम दत्तात्रेय खिलकुटी (पछुबंदर, कोळीवाडा, पश्चिम वसई, ठाणे), जितेश प्रकाश लोखंडे (LBSH मार्ग मनोर टाकवाहल ठाणे) आणि धर्मराज नारायण (पचुबंदर, वसई पालघर) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर अपघातात कविंद्र ज्ञान सिंह सिंह (उसाड़ा, रुद्रप्रयाग), रविन्द्र महादेव चव्हाण (C 714, ओम सद्गुरुनगर, ग्रेटर मुम्बई) हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत.

कार खड्ड्यात पडल्याने तिघांचा मृत्यू -मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जणांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र उपचारासाठी आलेल्या 3 जणांपैकी एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर चालकाची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. त्याचवेळी प्रवाशाची गंभीर प्रकृती पाहता त्याला ऋषिकेश एम्समध्ये पाठवण्यात आले आहे.

पोलीस एसडीआरएफने सुरू केली बचाव मोहीम : अपघाताची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफने घटनास्थळी तातडीने बचाव मोहीम सुरू केली. मुनी की रेती एसएसआय रमेश कुमार सैनी यांनी सांगितले की, अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या चार झाली आहे.

Last Updated : Sep 9, 2022, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details