मुंबई -मुंबई उच्च न्यायालयाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि केरळचे माजी राज्य सचिव बिनॉय कोडियेरी यांच्या डीएनए अहवालावर सुनावणी करण्यास परवानगी दिली. (Binoy Kodiyeri On Mumbai High Court) कोडियेरीचा डीएनए रिपोर्ट जाहीर करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवार (दि.04) रोजी ऑनलाइन सुनावणी झाली. कोडियेरी यांचा डीएनए निकाल जाहीर करण्याची मागणी बिहारच्या एका महिलेने केली होती. या याचिकेवर ही सुनावणी झाली. (Leader of the Marxist Communist Party Binoy Kodiyeri) या महिलेने गेल्या महिन्यात ३ मार्च रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
केस अनिश्चित काळासाठी चालू नये
एका बलात्काराच्या प्रकरणातील कोडियेरी यांची डीएनए चाचणीचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी बिहारमधील एका महिलेने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. दरम्यान, कोडियेरी यांच्या वकिलाने मंगळवारी या प्रकरणाचा ऑनलाइन विचार केला असता अधिक वेळ देण्याची विनंती केली होती. पीडित महिलेने अर्जात विनंती केली आहे की, केस अनिश्चित काळासाठी चालू नये. तसेच, त्यातील सत्य समोर यावे. रिपोर्ट जाहीर होताच सत्यता सिद्ध होईल. असे या महिलेने म्हटले होते.