मुंबई :मध्यप्रदेश पोलिसांनी मुंबईच्या एक जोडप्याला पकडण्यासाठी एक लूक आउट सर्कुलर जारी केली आहे. हे जोडप्यावर 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. दरम्यान आता हे जोडपे मुंबई आणि मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील खनियाधन पोलिसांच्या रडारमधून गायब झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील निसार जुबेर खान हा संशयित ड्रग्ज तस्कर आहे. मध्यप्रदेश पोलिसांच्या पथकाने आशिषकुमार एस. मेहता आणि त्याच पत्नी शिवानीला पकडण्यासाठी मध्य पोलिसांचे पथक दोनदा मुंबईत येऊन आले होते. मेहता दाम्पत्य अनेक रॅकेटमध्ये सामील: मेहता दाम्पत्यावर अनेक रॅकेट्स, घोटळ्यात सामील असल्याचा आरोप आहे. यात पॉन्झी स्कीम, डिजिटल चलन आणि मुंबईतील गोरेगाव स्काय-राईजमधील पॉश घरातून ड्रग्सचा सप्लाय करत असायचे. दरम्यान, मध्य प्रदेश पोलीस 11 जून रोजी प्रथम मुंबईत आले होते. त्यांनी मेहता कुटुंबीयांना 13 जून रोजी त्यांच्या पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.
वकिला आरोप : शिवपुरीचे पोलीस अधीक्षक (SP) रघुवंश सिंह भदौरिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, “ते (आशिष मेहता आणि त्यांची पत्नी शिवानी मेहता) कथित ड्रग प्रकरणात संशयित आहेत. एका अंमली पदार्थ प्रकरणातील तक्रारीच्या आधारे चौकशीसाठी त्यांना पकडण्यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे." परंतु मेहताच्या वकिलांनी सांगितले की, " त्यांच्या पक्षकाराला या प्रकरणात गोवले जात आहे. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. तपशील सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे.