महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर प्रवाशाकडून ३४.७९ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; प्रवाशाला केले अटक - हेरॉईन सापडले

सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर 35 कोटी रुपयांचे हेरॉईन आणि 4.5 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. संबंधित प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. ( Mumbai Airport Customs Seized Gold )

Mumbai Airport Customs Seized Gold
३४.७९ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

By

Published : Oct 3, 2022, 4:00 PM IST

मुंबई : कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडून 34.79 कोटी रुपयांचे 4,970 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. प्रवाशाने आपल्या ट्रॉली बॅगमध्ये प्रतिबंधित पदार्थ लपवला होता. ( Mumbai Airport Customs Seized Gold )

विमानतळावर प्रवाशाची झडती : विशिष्ट माहितीच्या आधारे शनिवारी कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर एका प्रवाशाची झडती घेतली. मुंबई विमानतळ कस्टम्सने ट्विट केले की, प्रवाशाच्या सामानाची झडती घेतली असता ट्रॉली बॅगमध्ये खास बनवलेल्या 'कॅव्हिटी'मध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळून आला.

तिघांना केले अटक: या प्रवाशाला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अन्य एका कारवाईत, शुक्रवारी मुंबई विमानतळावर 4.53 कोटी रुपयांचे 9,115 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले, अशी माहिती सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details