महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bullet Train Vapi Station : गुजरातच्या प्रवेशद्वाराजवळ बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात; जाणून घ्या, वापी स्टेशनची स्थिती - बुलेट ट्रेन प्रकल्प काम

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या काही ठिकाणी सुरू आहे, तर काही ठिकाणी अजून जमीन हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे. ईटीव्ही भारतच्या रिअॅलिटी चेकमधून काम कुठपर्यंत आले आहे याबाबतची माहिती जाणून घेतली होती. ईटीव्ही भारतची टीम आज गुजरातमधील वापी या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पोहचले. यावेळी वापी स्टेशनचे पिलरचे काम सध्या सुरू आहे. तरीही कामाची गती मंदच असल्याचे दिसून आले आहे.

Bullet Train Vapi Station
वापी स्टेशन, गुजरात

By

Published : Jan 15, 2023, 10:53 PM IST

वापी (गुजरात) : वापी हे महाराष्ट्रतून गुजरातला जाताना लागणारे पहिले बुलेट ट्रेन स्टेशन आहे. महाराष्ट्रातील बोईसर स्टेशननंतर वापी स्टेशन लागले. सध्या या स्टेशनचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच या मार्गवरील येणाऱ्या नद्यांवर पूल उभारण्याचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे. वापी स्टेशनजवळील जमिनीचे खोदकाम करणे, जमिनीची लेव्हलिंग करण्याचे काम सुरू आहे. या काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याबाबत स्पष्टता अजून झालेली नाही. त्यामुळे ईटीव्ही भारतच्या चेकमधून वापी परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पांचे काम सुरू असल्याचे दिसून आले आहे.

काय काम झाले : वापी रेल्वे स्थानक हे बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. सध्या येथे बांधकामाचे काम जोरात सुरू आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट कॉरिडॉरवर वापीजवळ चेंज 167 येथे बुलेट ट्रेन स्टेशन सुरू केले आहे. स्थानकाच्या कामकाजामुळे येथे सुमारे 12 ते 15 मीटर उंचीचे खांब उभारण्यात आले आहेत.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

सर्वात महत्वाचे स्थानक : दमणगंगा नदीच्या माती परीक्षणानंतर दमणगंगा नदीत 7 खांब तयार करण्यात येत आहेत. वापी नगरपालिकेच्या डुंगरा भागात बांधण्यात येणारे बुलेट ट्रेन स्टेशन हे अहमदाबाद नंतरचे सर्वात महत्वाचे स्टेशन आहे, ज्याची लांबी 1200 मीटर आहे. या कॉरिडॉरवर उभारण्यात येत असलेल्या खांबांमध्ये 183 घनमीटर काँक्रीट आणि 18,820 मेट्रिक टन स्टीलचा वापर केला जात आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

काय काम होणार : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान भारतातील पहिला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याच्या तयारीत आहे. त्याअंतर्गत वापीजवळ 13.05 मीटरचा पहिला खांब तयार करण्यात आला. वापीच्या डुंगरा परिसरात बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी आणखी एक पिलर तयार करण्यात आला आहे. वापी येथील बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे जनतेला अनेक पटीने फायदा होणार आहे. 1200 मीटर लांब अ‍ॅडव्हान्स स्टेशन बॉडी येथे बांधली जात आहे: वापी हे बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचे स्थानक आहे.

पिलर बनवण्याचे काम सुरू : वापीमध्ये 600 कोटी रुपये खर्चून 1200 मीटर लांबीचे स्टेशन बांधले जाणार आहे. मोदी सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यासाठी वापीतील डुंगरा येथे 600 कोटी रुपये खर्चून 1200 मीटर लांबीचे अजून एक स्टेशन बांधण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची निविदा L&T ला आल्यानंतर वापी येथील डुंगरा परिसरात बुलेट ट्रेन स्टेशनसाठी पिलर बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत वलसाड जिल्ह्यात ज्यांच्या जमिनी-मालमत्तेची भरपाई करायची आहे, त्यांना ९९ टक्के भरपाई देण्यात आली आहे.

हेही वाचा :Bullet Train Thane Station : ठाण्याला आहे बुलेट ट्रेनच्या स्टेशनची प्रतिक्षा; कामाचा अद्याप ठावठिकाणाही नाही

ABOUT THE AUTHOR

...view details