महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sadhna Gupta: मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नीचे निधन; लखनऊमध्ये झाले अंतिम संस्कार - Mulayam Singh Yadav Second Wife Dies

समजवादी पक्षाचे संस्थापक आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे रविवार (दि. 9 जुलै)रोजी दु:खद निधन झाले. ( Mulayam Singh Yadav Second Wife Dies ) त्यांच्यावर आज रविवार लखनऊमधील पिपराघाट येथे हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचे चिरंजीव प्रतीक यादव यांनी अंतिम संस्कार केले.

मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना यादव यांच्यावर अंतिम संस्कार
मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना यादव यांच्यावर अंतिम संस्कार

By

Published : Jul 10, 2022, 6:57 PM IST

लखनऊ -समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन झाले. दरम्यान, रविवारी त्यांच्यावर लखनऊमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. ( Sadhana Gupta, the second wife of Mulayam Singh Yadav ) मुलायमसिंग यांचा मुलगा प्रतीक यादव यांनी त्यांच्या आई साधना यांना अग्निडाग दिला. मुलायम सिंह यांच्या विक्रमादित्य मार्गावरील घरापासून त्यांची पत्नी साधना गुप्ता यांचे पार्थिव दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपराघाट येथे हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अंतिमसंस्कार पार पडले. यावेळी मुलायमसिंह यांच्यासह माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही यावेळी उपस्थित होते.

व्हिडीओ

संपूर्ण कुटुंबाने श्रद्धांजली वाहिली - राम गोपाल यादव, शिवपाल सिंह यादव, धर्मेंद्र यादव, अक्षय प्रताप यादव, प्रतीक यादव, आदित्य यादव, अपर्णा बिश्त, अमन बिश्त यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. मुलायम सिंह यादव आणि साधना गुप्ता यांचे पुत्र प्रतीक यादव यांनी मातेच्या पूजेला दीपप्रज्वलन केले. यावेळी संपूर्ण कुटुंबाने चितेला श्रद्धांजली वाहिली.

मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना यादव यांच्यावर अंतिम संस्कार

साधना गुप्ता या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या - साधना यादव या सपा संरक्षक मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या, ज्यांना मुलगा प्रतीक यादव आणि सून अपर्णा सिंह बिश्त आहेत. साधना गुप्ता या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. साधना गुप्ता यांच्यावर लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना, आराम मिळत नसताना त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. साधना गुप्ता यांचे शनिवारी फुफ्फुसाच्या संसर्गामुळे निधन झाले.

मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना यादव यांच्यावर अंतिम संस्कार

हे लग्न फार काळ टिकू शकले नाही - साधना गुप्ता यांनी मुलायम सिंह यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. साधना यांचे पहिले लग्न ४ जुलै १९८६ रोजी फरुखाबाद येथील चंद्रप्रकाश गुप्ता यांच्यासोबत झाले होते. एका वर्षानंतर 7 जुलै 1987 रोजी त्यांचा मुलगा प्रतीक यादवचा जन्म झाला. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. अखिलेश यांची सावत्र आई आणि मुलायम सिंह यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता होत्या.

मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना यादव यांच्यावर अंतिम संस्कार

अखिलेश यादव यांनी साधना यांना कधीच आई मानले नाही - मुलायम सिंह यादव यांच्या पहिल्या पत्नीचे (2003)मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांनी साधना गुप्ता यांना पत्नी म्हणून घोषीत केले. अखिलेश यादव यांनी साधना यांना कधीच आई मानले नाही. साधना गुप्ता यांना त्यांच्या कुटुंबात कधीही स्थान देण्यात आले नाही. साधना गुप्ता आणि अमर सिंग यांच्यामुळे त्यांच्या वडिलांनी आईला न्याय दिला नाही, असे त्यांचे मत आहे.

मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना यादव यांच्यावर अंतिम संस्कार

शाळेच्या फॉर्मवर वडिलांचे नाव एमएस यादव - मुलायम यांनी हे नाते स्वीकारावे असे अखिलेश यांना वाटत नव्हते. (1994)मध्ये प्रतिक यादवच्या शाळेच्या फॉर्मवर वडिलांचे नाव एमएस यादव आणि मुलायम सिंह यांच्या कार्यालयाचा पत्ता देण्यात आला होता. परंतु, मुलायम सिंह यादव यांनी (2003)मध्ये याची घोषणा केली होती.

हेही वाचा - Political instability In Sri Lanka: श्रीलंकेतील परिस्थिती चिघळली! रस्त्यावर आंदोलकांचा कब्जा

ABOUT THE AUTHOR

...view details