महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sadhna Gupta Passes Away : मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन

मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. ( mulayam singh yadav wife passes away ) मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी दुपारी गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात फुफ्फुसाच्या संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या मेदांता रुग्णालयात दाखल होत्या. साधना गुप्ता या मुलायम सिंह यादव यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होत्या.

Sadhna Gupta Passes Away
मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन

By

Published : Jul 9, 2022, 3:57 PM IST

Updated : Jul 9, 2022, 4:18 PM IST

लखनऊ - मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. ( mulayam singh yadav wife passes away ) मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी दुपारी गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात फुफ्फुसाच्या संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या मेदांता रुग्णालयात दाखल होत्या. साधना गुप्ता या मुलायम सिंह यादव यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होत्या.

2003 मध्ये मुलायम सिंह यादव यांच्यासोबत लग्न - साधना गुप्ता यांचे 1987 मध्ये पहिले लग्न झाले होते. लग्नाच्या 4 वर्षानंतरच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्या मुलायम सिंह यादव यांच्या संपर्कात आल्या होत्या. मुलायम सिंह यादव यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर 2003 मध्ये त्यांच्याशी लग्न केल्याची औपचारिक घोषणा केली होती.

अखिलेश यादव यांची सावत्र आई - साधना गुप्ता यांनी मुलायम सिंह यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. साधना यांचे पहिले लग्न ४ जुलै १९८६ रोजी फरुखाबाद येथील चंद्रप्रकाश गुप्ता यांच्यासोबत झाले होते. एका वर्षानंतर 7 जुलै 1987 रोजी त्यांचा मुलगा प्रतीक यांचा जन्म झाला होता. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि काही दिवसातच दोघेही वेगळे झाले. अखिलेश यांची सावत्र आई आणि मुलायम सिंह यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता होती.

अखिलेश आणि त्यांच्यात होता वाद -मुलायम सिंह यादव यांच्या पहिल्या पत्नीचे 2003 मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांनी साधना गुप्ता यांना पत्नी म्हणून घोषित केले. अखिलेश यादव यांनी साधना यांना कधीच आई मानले नाही. साधना गुप्ता यांना त्यांच्या कुटुंबात कधीही स्थान देण्यात आले नाही. साधना गुप्ता आणि अमर सिंग यांच्यामुळे त्यांच्या वडिलांनी आईला न्याय दिला नाही, असे त्यांचे मत आहे. मुलायम यांनी हे नाते स्वीकारावे असे अखिलेश यांना वाटत नव्हते. 1994 मध्ये प्रतिक यादवच्या शाळेच्या फॉर्मवर वडिलांचे नाव एमएस यादव आणि मुलायम सिंह यांच्या कार्यालयाचा पत्ता देण्यात आला होता. पण त्याची घोषणा मुलायमसिंह यादव यांनी 2003 मध्ये केली होती.

हेही वाचा -Pithoragarh Landslide Video : उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; लोक रस्ता ओलांडत असताना कोसळली दरड, पाहा व्हिडिओ

Last Updated : Jul 9, 2022, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details