महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mulayam Singh Yadav Health : मुलायम सिंह यादव आयसीयूत; प्रकृती खालवल्याने मेंदाता रुग्णालयात दाखल - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

समाजवादी पक्षाचे ( Samajwadi Party ) माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव ( Mulayam Singh Yadav ) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात ( Mulayam Singh Yadav in ICU ) आले आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल ( Mulayam Yadav at Medanta Hospital )आहेत.

Mulayam Singh Yadav
मुलायम सिंह यादव

By

Published : Oct 2, 2022, 10:11 PM IST

Updated : Oct 2, 2022, 10:55 PM IST

लखनौ : समाजवादी पक्षाचे ( Samajwadi Party ) माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव ( Former Chief Minister Mulayam Singh Yadav ) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले ( Mulayam Singh Yadav health deteriorated ) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह यादव हे अनेक दिवसांपासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात ( Mulayam Yadav at Medanta Hospital ) दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये ( Mulayam Singh Yadav in ICU ) हलवण्यात आले आहे.

अखिलेश यादव कुटुंबीयांसह रुग्णालयात - त्याची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष,मुलायम सिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) कुटुंबीयांसह मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. मुलायम यांचे धाकटे भाऊ शिवपाल सिंह यादव, मुलायम यांची धाकटी सून अपर्णा यादवही दिल्लीत पोहोचल्या आहेत. मुलायम सिंह यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

मोदींनी केली प्रकृतीची विचारपूस- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी बोलून मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जे काही शक्य मदत आवश्यक असेल, ते मदतीसाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले

राजनाथ सिंहने केला अखिलेशला फोन - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Union Conservation Minister Rajnath Singh ) यांनी अखिलेश यादव यांना फोन करून मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तो लवकर बरे व्हावे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. असे ट्विट देखील त्यांनी केले आहे.

Last Updated : Oct 2, 2022, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details