महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mulayam Singh Yadav Passed Away : मुलायम सिंह यांचा शिक्षक ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा झंझावात; संघर्षाची अनोखी कहाणी

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव ( Mulayam Singh Yadav Death ) यांचे 82 व्या वर्षी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात ( Medanta Hospital ) निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुलायम सिंह ( Mulayam Singh ) यांच्या झंझावाताने उत्तर प्रदेशात समाजवाद मोठ्या प्रमाणावर पसरला होता. मुलायम सिंह यांचा जलवा असाच प्रस्थापित झाला नव्हता. यामागे त्यांच्या संघर्षाची मोठी काहानी दडलेली आहे.

Mulayam Singh Yadav
मुलायम सिंह यादव

By

Published : Oct 10, 2022, 4:05 PM IST

Updated : Oct 10, 2022, 5:23 PM IST

लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव ( Mulayam Singh ) यांचे 82 व्या वर्षी गुरुग्राममधील मेदांता ( Medanta Hospital ) रुग्णालयात निधन ( Mulayam Singh Yadav Death ) झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली ( Mulayam Singh Yadav Passed Away ) आहे. मुलायम सिंह यादव यापूर्वी तीन वेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. काही वर्षापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, त्यांचे नाव आजही उत्तर प्रदेशातील लोकांच्या मनात कायम आहे. यापूर्वी 24 जून रोजी मुलायम सिंह यांना दाखल करण्यात आले होते - मुलायम सिंह यादव यांना यापूर्वी 24 जून 2022 रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे नियमित तपासणी, उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, त्याआधी मुलायम यांना १५ जूनच्या संध्याकाळी मेदांता येथे दाखल करण्यात आले होते. तेथे तपासणी केल्यानंतर त्यांना 2 दिवसात डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय त्यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे ९ जुलै रोजी निधन झाले होते. साधना गुप्ता यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. उत्तर प्रदेशात एक घोषणा खूप लोकप्रिय आहे' जिसका जलवा कायम है, उसका नाम मुलायम है'. मुलायम सिंह यांच्या झंझावाताने उत्तर प्रदेशात समाजवाद मोठ्या प्रमाणावर पसरला होता. मुलायम सिंह यांचा जलवा असाच प्रस्थापित झाला नव्हता. यामागे त्यांच्या संघर्षाची मोठी काहानी दडलेली आहे.

मुलायम सिंह यांचा जीवण प्रवास

लखनौ विद्यापीठातून राज्यशास्त्रात पीएचडी - मुलायम सिंह यांनी राज्यशास्त्र विषयात बीए, एमए केले आहे. नंतर त्यांनी लखनौ विद्यापीठातून राज्यशास्त्रात पीएचडी केली. मुलायम सिंह यादव यांनी मैनपुरीच्या करहल शहरात असलेल्या जैन इंटर कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे शिक्षक म्हणूनही काम केले होते. याच काळात ते राजकारणात सक्रिय झाले. राजकारणाच्या जगात सुरुवातीपासूनच त्यांचा समाजवादाकडे कल होता. त्यांनी इटावा-मैनपुरी येथील समाजवादी राजकारणातही भाग घ्यायला सुरुवात केली होती. हळूहळू ते राम मनोहर लोहिया, चौधरी चरणसिंग यांच्या चळवळीशी जोडले गेले होते. जवळपास 6 दशकांच्या राजकीय प्रवासात त्यांनी जवळपास प्रत्येक उच्च पदावर काम केले आहे. मात्र, प्रचंड इच्छा असूनही त्यांना कधीच पंतप्रधानपद मिळाले नाही. असे असूनही मुलायमसिंग यादव यांचा सैफई ते लखनौ नंतर दिल्ली असा प्रवास अतिशय रंजक राहिला आहे. 90 च्या दशकात, जेव्हा जय श्री रामच्या घोषणा अयोध्येसह देशभर गुंजत होत्या, तेव्हा एक लोकप्रिय घोषणा उत्तर प्रदेशात खुप लोकप्रिय होती. जिसका जलवा कायम है, उसका नाम मुलायम है' हा नारा आजही उत्तर प्रदेशातील जनतेच्या मनात कायम आहे. आज पण ही लोकप्रिय घोषणा मुलायम सिंह यादव यांच्यासाठी दिली जाते. 1992 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती.

मुलायम सिंह यादव राम मनोहर लोहिया सोबत

मुलायम सिंह यांचा राजकीय जीवन प्रवास -मुलायम सिंह यादव उत्तर भारतातील मोठे समाजवादी, शेतकरी नेते होते. त्यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता. मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेशात आमदार म्हणून पहिल्यांदा आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. अल्पावधीतच संपूर्ण उत्तर प्रदेशात मुलायमसिंहांचा प्रभाव दिसून आला. मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेशातील इतर मागासवर्गीय समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. सामाजिक जाणिवेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात ओबीसींना महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. समाजवादी नेते रामसेवक यांचे मुलायम सिंह यादव शिष्य होते. त्यांच्या आशीर्वादाने मुलायम सिंह पहिल्यांदा 1967 मध्ये विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते तसेच त्यांना मंत्रीपदही देण्यात आले होते. 1989 साली पहिल्यांदा मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. ते 5 डिसेंबर 1989 ते 24 जानेवारी 1991, 5 डिसेंबर 1993 ते 3 जून 1996, 29 ऑगस्ट 2003 ते 11 मे 2007 असे तीन वेळा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भूषवले आहे. याशिवाय ते केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशातील यादव समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात. मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेशमध्ये सामाजिक सलोखा राखण्यात मोठे योगदान दिले आहे. मुलायम सिंह यांची एक धर्मनिरपेक्ष नेता अशी ओळख आहे. त्यांचा पक्ष समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष मानला जातो. उत्तर प्रदेशच्या राजकीय जगतात मुलायमसिंह यादव यांना प्रेमाने नेताजी म्हटले जाते.

मुलायम सिंह यादव

1996 मध्ये देशाच्या राजकारणात प्रवेश -मुलायम सिंह यांचा 1996 मध्ये केंद्रीय राजकारणात प्रवेश झाला. तेव्हा काँग्रेस पक्षाचा पराभव करून संयुक्त आघाडीने केंद्रात सरकार स्थापन केले होते. एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले होते. मात्र हे सरकारही फार काळ टिकू शकले नाही. या काळात देशाला तीन वर्षांत दोन पंतप्रधान लाभले होते. 'भारतीय जनता पक्षा सोबतच्या त्यांच्या नाराजीवरुन वाटत होते की ते काँग्रेसच्या जवळ जातील. मात्र, पण 1999 मध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आश्वासन न दिल्याने काँग्रेसला उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध आणखी ताणले गेले. 2002 च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने 391 जागांवर आपले उमेदवार उभे केले, तर 1996 च्या निवडणुकीत केवळ 281 जागा त्यानी लढवल्या होत्या.

मुलायमसिंह यादव यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे -

मुलायम सिंह यादव 1967 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले, 1969 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. १९७४ मध्ये मुलायमसिंह यादव पुन्हा आमदार झाले, 1977 मध्ये प्रथमच उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री बनले, 1980 मध्ये लोकदलाचे अध्यक्ष झाले, 1982 ते 1985 या काळात ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते, 1989 मध्ये ते प्रथमच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, 1990 मध्ये जनता दल (समाजवादी) मध्ये सामील झाले, 1992 साली समाजवादी पक्षाची स्थापना केली, 1993 मध्ये दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले, 1996 मध्ये पहिल्यांदा मैनपुरीमधून मतदार संघातून खासदार बनले, 1999 मध्ये संयुक्त आघाडी सरकारच्या अंतर्गत भारताचे संरक्षण मंत्री झाले, 1999 मध्ये संभल कन्नौज लोकसभा मतदारसंघातून पुन्हा खासदार झाले, 2003 मध्ये तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले, 2004 साली सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम केला, 2004 मध्ये मैनपुरीमधून लोकसभा निवडणूक जिंकली, 2014 मध्ये आझमगड, मैनपुरी येथून निवडणूक जिंकली, 2019 मध्ये ते पुन्हा खासदार झाले. खासदार होण्याची त्यांची ही सातवी वेळ होती.

मुलायमसिंह यादव 8 वेळा विधानपरिषदेचे सदस्य होते, त्यानंतर 7 वेळा लोकसभेचे सदस्य होते.

विधान परिषद 1982-1985

विधानसभा 1967, 1974, 1977, 1985, 1989, 1991, 1993 आणि 1996 (आठ वेळा)

विरोधी पक्षनेते, उत्तर प्रदेश विधान परिषद 1982-1985

विरोधी पक्षनेते, उत्तर प्रदेश विधानसभा 1985-1987

केंद्रीय कॅबिनेट मंत्री

सहकार आणि पशुसंवर्धन मंत्री 1977

संरक्षण मंत्री 1996-1998

Last Updated : Oct 10, 2022, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details