बद्रीनाथ Mukesh Ambani visited Badrinath Dham : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे त्यांच्या देवभक्तीसाठीही ओळखले जातात. अलीकडेच मुकेश अंबानी यांनी गणेशोत्सवात भव्य पूजा केली होती. यानंतर आज मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह धार्मिक पर्यटनासाठी उत्तराखंडमध्ये पोहोचले. याठिकाणी त्यांनी सर्वप्रथम बद्रीनाथ धामला जात बद्रीनाथाचे दर्शन घेतले.
बद्री केदार मंदिर समितीला पाच कोटी रुपये दान : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज बद्रीनाथ मंदिरात प्रार्थना केली. यावेळी मुकेश अंबानींसोबत त्यांचं कुटुंबीयही उपस्थित होतं. बद्रीनाथ धामवर पोहोचल्यावर मंदिर समितीचे उपाध्यक्ष किशोर पनवार यांनी मुकेश अंबानी यांचं जोरदार स्वागत केलं. भगवान बद्री विशालचा आशीर्वाद घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीला 5 कोटी रुपयांची देणगी दिलीय. मुकेश अंबानी यांनी बद्री केदार मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांना 5 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केलाय.
बद्रीनाथहून केदारनाथला पोहोचले मुकेश अंबानी : बद्रीनाथ धामला भेट दिल्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी केदारनाथ धामला पोहोचले. याठिकाणी मुकेश अंबानी यांनी बाबा केदारच्या धाममध्ये प्रार्थना केली. यावेळी केदारनाथ धाममध्ये देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना पाहून तिथं आलेल्या भाविकांना आनंद झाला. तिथं उपस्थित असलेल्या लोकांना मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाची एक झलक पाहायची होती.