महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एमएसपी होता, आहे आणि राहणार, राज्यसभेत मोदींची ग्वाही - agri law

एमएसपी संपुष्टात येणार असल्याचा भ्रम पसरवला जात आहे. मात्र एमएसपी होता, आहे आणि राहणार असे आश्वासन मी देतो असे मोदी राज्यसभेत म्हणाले.

एमएसपी राहणार, मोदींची ग्वाही
एमएसपी राहणार, मोदींची ग्वाही

By

Published : Feb 8, 2021, 2:26 PM IST

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांमुळे एमएसपीची व्यवस्था मोडीत निघण्याचे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्णपणे खोडून काढले. एमएसपीची व्यवस्था ही भविष्यातही कायम राहिल याची ग्वाही आपण देतो असे मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले.

एमएसपी राहणार, मोदींची ग्वाही

एमएसपी कायम राहणार

एमएसपी संपुष्टात येणार असल्याचा भ्रम पसरवला जात आहे. मात्र एमएसपी होता, आहे आणि राहणार असे आश्वासन मी देतो असे मोदी राज्यसभेत म्हणाले. एमएसपी टिकवतानाच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दुसऱ्या उपायांवरही लक्ष दिले पाहिजे. कृषीवरील अवलंबित्व कमी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे मोदी म्हणाले. हे करण्यात आपण उशीर केला, तर आपण शेतकऱ्यांना अंधःकारात लोटण्याचे भागीदार असू असे मोदी म्हणाले.

छोट्या शेतकऱ्यांसाठी केल्या अनेक तरतूदी

छोट्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होत नाही. आधीच्या पिक विमा योजनेचाही छोट्या शेतकऱ्यांना फायदा होत नव्हता. छोट्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधाही मिळत नव्हत्या. युरिया मिळविण्यासाठीही छोट्या शेतकऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागत होते. 2014 नंतर आम्ही पिक विमा योजनेची व्याप्ती वाढविली. यामाध्यमातून 90 हजार कोटींचा लाभ शेतकऱ्यांना झाला. किसान क्रेडीट कार्ड योजनेचीही व्याप्ती वाढविली. पावणेदोन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असे मोदी म्हणाले.

किसान सन्मान निधीचेही केले कौतुक

किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. 1 लाख 15 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात गेले. मात्र बंगालचे शेतकरी राजकारणामुळे या योजनेपासून वंचित राहिले असे मोदी म्हणाले. याशिवाय निम कोटेड युरियामुळेही छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाला. छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजनाही आणल्याचेही ते म्हणाले.

कृषीमाल वितरणासाठीही योजना

छोट्या शेतकऱ्यांसाठी आम्ही किसान रेल्वेची संकल्पना मांडली. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी मोठा फायदा झाला. किसान उडान योजनेचाही शेतकऱ्यांना फायदा झाला असे मोदी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details